बौद्धजनहितवर्धक संघ येवती यांच्या वतीने पत्रकार दिन साजरा.
बौद्धजनहितवर्धक संघ येवती यांच्या वतीने पत्रकार दिन साजरा.
कराड - प्रतिनिधी.
बौद्धजनहितवर्धक संघ येवती यांच्या वतीने पत्रकार दिनी पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांचा केला सन्मान. येवती ता - कराड येथील लोकमतचे पत्रकार व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्राचे संघटक ज्ञानेश्वर शेवाळे यांचा बौद्धजनहितवर्धक संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त त्यांचा सन्मान करण्यात आला .यावेळी बौद्धजनहितवर्धक संघ येवती यांचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी बोलताना पत्रकार शेवाळे म्हणाले, की माणूस म्हणुन जन्माला आल्यावर, आपण समाजाला काहीतरी देणे लागतो. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून गेल्या दहा वर्षापासून पत्रकारिता करून आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा मी प्रयत्न आटोकाट करत आहे . यावेळी शिवतेज सामाजिक विकास संस्था येवती व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, सातारा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेल्या दिनदर्शिकाचे प्रकाशन करण्यात आले .


Comments
Post a Comment