Posts

सोनवडे ता- शिराळा येथे 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

Image
सोनवडे ता- शिराळा येथे 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. शिराळा- प्रतिनिधी.(नानासाहेब कांबळे.) सोनवडे ता- शिराळा येथे 77 व स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला. सोनवडे ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले. ध्वज पूजन सोनवडे गावचे सरपंच सोनाली युवराज नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.ध्वजारोहण विश्वास सहकारी साखर कारखाना माजी संचालक शामराव बुधाजी नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.  देशासाठी वीरमरण पत्करलेल्या शहिदांच्या स्मृती प्रित्यर्थ  त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने शीला फलकाचे निर्माण केले गेले.या शीला फलकांचे उद्घाटन सोनवडे गावचे सरपंच सोनाली युवराज नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. शीला फलकाच्या उद्घाटनावेळी ग्रामपंचायतचे सदस्य रवींद्र महादेव खंडागळे, गणपत मारुती पवार, पांडुरंग बाबर, दीप्ती प्रताप नाईक, मनीषा गोरख कुंभार ,मंदाताई रंगराव पाटील ,संगीता रामचंद्र राणे सर्व सदस्य उपस्थित होते,तसेच सोनवडे गावचे पोलीस पाटील योजना बाळू बागडे उपस्थित होत्या. कार्यक्रमावेळी आरोग्य कर्मचारी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवडीचे शिक्षक तसेच हुतात्मा ना...

वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागाव मध्ये स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न.

Image
  वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागाव मध्ये स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न. शिराळा -प्रतिनिधी. वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागाव मध्ये स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन  संपन्न झाला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत ए बी साळुंखे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाचे स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापनदिन ध्वजारोहण विद्यालयाचे मुख्याध्यापक ए आर पाटील सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात राष्ट्रगीत ,झेंडा गीत, सारे जहासे अच्छा आणि महाराष्ट्र राज्य गीत घेण्यात आली.या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे विद्यमान संचालक एम डी पाटील सर यांचा शिव केदार विद्यालय कांदे येथील मुख्याध्यापक म्हणून सेवा निवृत्त झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष व माजी सभापती चंद्रकांत पाटील भाऊ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  त्याचप्रमाणे विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कुमारी दीपाली चंद्रकांत शिद एग्रीकल्चर सायंटिफिक रिक्रुटमेंट बोर्ड नवी दिल्ली यांच्यावतीने नेट परीक्षेत उज्वल यश संपादन केल्याबद्दल  भैरवनाथ दूध संस्थेचे चेअरमन शामराव पाटील आप्पा यांच्या हस्ते  सत्कार...

कोडोली हायस्कूल मध्ये 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न.

Image
  कोडोली हायस्कूल मध्ये 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न. कार्वे प्रतिनिधी :- भारती विद्यापीठाचे, हौसाबाई विठ्ठलराव पाटील प्रशालेमध्ये 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संभाजी पाटील होते .शाळेचे ध्वजारोहण श्री.अक्षय पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या समवेत तिरंगा ध्वजास मानवंदना दिली. शाळेतील विद्यार्थिनींनी समूहगीते, देशभक्तीपर गीते सादर केली. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा दिल्या. तसेच विद्यार्थिनींनी झांज पथकाचे उत्कृष्ट सादरीकरण केले. या कार्यक्रमा प्रसंगी  शुभसंदेश मा.श्री मोरे आय. जे. यांनी दिला. आभार सौ. जाधव व्ही. ए. यांनी मानले,सूत्रसंचालन सौ. संदे एस. ए. यांनी केले. तसेच या कार्यक्रमास प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,माजी सैनिक नेर्लेकर आण्णा, चंद्रकांत पाटील, संभाजी जगताप, बाजीराव जगताप सर्व विद्यार्थी,पालक, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागाव मध्ये ʼमेरी माटी, मेरा देश ʼअभियानांतर्गत द्वितीय दिन ध्वजारोहन समारंभ.

Image
  वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागाव मध्ये ʼमेरी माटी, मेरा देश ʼअभियानांतर्गत द्वितीय दिन ध्वजारोहन समारंभ. शिराळा - प्रतिनिधी.       दिनांक १४ ऑगस्ट २०२३ वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागाव मध्ये ʼमेरी माटी, मेरा देशʼ अभियानांतर्गत द्वितीय दिन १४ऑगस्ट ध्वजारोहन समारंभ उत्साहात संपन्न झाला . या समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक ए बी साळुंखे मॅडम यांनी केले. माननीय मुख्याध्यापक ए आर पाटील सर यांचे हस्ते ध्वजारोहण समारंभाचे प्रमुख अतिथी माजी सैन्य दलातील सेवानिवृत्त नायब सुभेदार श्री. माणिक कृष्णा पाटील यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.  १४ ऑगस्ट चे द्वितीय दिन  ध्वजारोहण माजी सैन्य दलातील नायब सुभेदार पदी २५ वर्ष सेवा करणारे श्री. माणिक कृष्णा पाटील यांचे शुभ हस्ते करण्यात आले.  ध्वजारोहन प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक उपस्थित होते . या  समारंभाचे सूत्रसंचालन एस .एच .इंगवले सरांनी केले तर आभार प्रदर्शन यु.आर. नांगरे मॅडम यांनी केले.

कृष्णा कृषी परिषदेच्या अध्यक्षपदी गजेंद्र पाटील यांची निवड

Image
कृष्णा कृषी परिषदेच्या अध्यक्षपदी गजेंद्र पाटील यांची निवड रेठरे बुद्रुक, ता. ११ : येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याशी संलग्न असलेल्या कृष्णा कृषी परिषदेच्या अध्यक्षपदी गजेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली. याबद्दल कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते श्री. पाटील यांचा सत्कार करण्यात आला.           कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतीला उर्जितावस्था आणण्यासाठी आणि शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादनवाढीला चालना देण्यासाठी कृष्णा कृषी परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. या परिषदेच्या माध्यमातून सातत्याने ऊसविकास मेळाव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत सल्ला व मार्गदर्शन दिले जाते.           परिषदेच्या नूतन अध्यक्षपदी गजेंद्र पाटील (आटके) यांची निवड करण्यात आली आहे. याबद्दल चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते श्री. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कृषी परिषदेचे संचालक धनाजीराव पाटील, धोंडिराम कदम, जयवंत नांगरे, सुजीत मोरे, ब्रिजराज मोहिते, कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, जितेंद्र पाटील, धो...

युवराज धोंडीराम माने यांचे निधन.

Image
कालकथीत   युवराज धोंडीराम माने यांचे निधन. कासेगाव - प्रतिनिधी. कासेगाव (ता.वाळवा) येथील बौध्द समाजातील जेष्ठ कार्यकर्ते युवराज धोंडीराम माने (वय ८४वर्षे) यांचे वार्धक्याने आजाराने निधन झाले. त्यांनी रेल्वे खात्यातून वरिष्ठ अधिकारी म्हणून निवृत्त झाल्यानंतर बौध्द समाज व गावातील सार्वजनिक कार्यास वाहून घेतले होते. ते वाय डी भाऊ म्हणून सर्वांना परिचित होते. त्यांनी पश्चिम भाग सेवा सोसायटीत अनेक वर्षे संचालक म्हणून जबाबदारी पाहिली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,विवाहित मुलगा,मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन रविवार दि.१३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता कासेगाव येथे होणार आहे.

डॉ. एस आर रंगनाथन म्हणजे असामान्य ज्ञान प्रसारक _____ मा.कांचन धर्मे.

Image
  डॉ. एस आर रंगनाथन म्हणजे असामान्य ज्ञान प्रसारक                         _____ मा.कांचन धर्मे.   कराड -प्रतिनिधी. विद्यानगर येथील समाजभूषण बाबुराव गोखले ग्रंथालय सैदापूर येथे ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस आर रंगनाथन यांची जयंती ग्रंथपाल दिन म्हणून साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी ग्रंथालयाच्या अध्यक्षा कांचन धर्मे  म्हणाल्या, डॉ. एस आर रंगनाथन यांनी 1928 मध्ये ग्रंथालय संघाची स्थापना करून भारतातील सार्वजनिक ग्रंथालय चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. डॉ. रंगनाथन यांनी जगापेक्षा वेगळे कार्य करून दाखवण्याच्या उद्देशाने नोकरी सोडून समाजाला ग्रंथालयाच्या माध्यमातून परिपूर्ण बनण्याचा निश्चय केला. त्यांचे हे कार्य आजही ग्रंथपालांना प्रेरणादायी  आहे. कार्यक्रमास मा. चंद्रकांत धर्मे, सौरभ चव्हाण, अंगणवाडी सेविका सुनिता जाधव,रेश्मा कसबे, सीमा कांबळे, योगेश ठोंबरे ग्रंथालयाचे सभासद वाचक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार ग्रंथपाल रुकसाना नदाफ यांनी मांनले.