डॉ. एस आर रंगनाथन म्हणजे असामान्य ज्ञान प्रसारक _____ मा.कांचन धर्मे.

 

डॉ. एस आर रंगनाथन म्हणजे असामान्य ज्ञान प्रसारक
                        _____ मा.कांचन धर्मे.



 
कराड -प्रतिनिधी.
विद्यानगर येथील समाजभूषण बाबुराव गोखले ग्रंथालय सैदापूर येथे ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस आर रंगनाथन यांची जयंती ग्रंथपाल दिन म्हणून साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी ग्रंथालयाच्या अध्यक्षा कांचन धर्मे  म्हणाल्या, डॉ. एस आर रंगनाथन यांनी 1928 मध्ये ग्रंथालय संघाची स्थापना करून भारतातील सार्वजनिक ग्रंथालय चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. डॉ. रंगनाथन यांनी जगापेक्षा वेगळे कार्य करून दाखवण्याच्या उद्देशाने नोकरी सोडून समाजाला ग्रंथालयाच्या माध्यमातून परिपूर्ण बनण्याचा निश्चय केला. त्यांचे हे कार्य आजही ग्रंथपालांना प्रेरणादायी  आहे. कार्यक्रमास मा. चंद्रकांत धर्मे, सौरभ चव्हाण, अंगणवाडी सेविका सुनिता जाधव,रेश्मा कसबे, सीमा कांबळे, योगेश ठोंबरे ग्रंथालयाचे सभासद वाचक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार ग्रंथपाल रुकसाना नदाफ यांनी मांनले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .