संत रोहिदास विकास प्रतिष्ठान तर्फे यशस्वी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात संपन्न.

 संत रोहिदास विकास प्रतिष्ठान तर्फे यशस्वी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात संपन्न.

 उंडाळे  - प्रतिनिधी.

मुलांना चांगले संस्कार देणे त्यांना योग्य मार्गदर्शन करणे  आश्या उगवत्या पिढीतील  तरुण युवा वर्गाला  प्रोसाहित करण्याचे यशस्वी कार्य सुरुवातीपासून उराशी बाळगणाऱ्या संत रोहिदास विकास प्रतिष्ठानचे विशेष अभिनंदन करावे वाटते असे व्याख्याते दत्तात्रय पवार यांनी कराड येथील संत  रोहिदास विकास प्रतिष्ठान आयोजित केलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कराड पोलीस अधिकारी अजय गोरड व्याख्याते व कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय पवार गुरुजी ग्रामविकास अधिकारी श्रीकांत होलमुखी उपस्थित होते आजच्या स्पर्धात्मक युगात वावरताना विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनत करून आपलं अस्तित्व निर्माण करणे गरजेचे आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी अनेक गोष्टीवर पाणी सोडण्याची तयारी प्रत्येकाने ठेवली पाहिजे त्यांनी या वेळी  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी किती पदव्या ग्रहण केल्या याचा पाढा वाचला त्यांनी देशासाठी जी घटना लिहिली ती जोपर्यंत सूर्य चंद्र असतील तोपर्यंत या संविधानाला कोणीही हात लावणार नाही असे सांगितले यावेळी त्यांनी अनेक विषयांवर विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले त्या कार्यक्रमाला कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अजय गोरड सर यांनी मी कॉन्स्टेबल होतो माझे परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर मी पोलीस अधिकारी पर्यंत पोचलो आहे त्यामुळे तरुणांनी पोलीस दलात यावे आपल्याकडून देशसेवा घडावी असे मुलगा मुलांना मार्गदर्शन केले यावेळी पत्रकार भीमराव धुळप संघटनेचे सचिव अंकुश थोरात यांनी देखील मार्गदर्शनपर भाषण केली सूत्रसंचालन सदाशिवराव रामगुडे सर आभार प्रदर्शन महेश पवार यांनी व्यक्त केले यावेळी संत रोहिदास विकास प्रतिष्ठान चे श्री यादव .श्री होलमुखे. श्री शिंदे सर .श्री डोईफोडे. श्री कारंडे. श्री लोकरे. श्री सोरटे .श्री लाडी हे मान्यवर उपस्थित होते   त्याचबरोबर कराड दक्षिण उत्तर मधील विद्यार्थी पालक उपस्थित होते प्रतिष्ठान मार्फत गुणवत्त विद्यार्थी यांना नोटबुक प्रशासित पत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.


******************************************


मा. पंकज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रोग निदान  व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.




Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .