विधानसभेच्या सात जागांसाठी येत्या 5 सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक.

 

विधानसभेच्या सात जागांसाठी येत्या 5 सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक.

गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट:-

विधानसभेच्या सात जागांसाठी येत्या 5 सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक घेतली जाणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि. 8) दिली. ज्या जागांसाठी मतदान घेतले जाणार आहे, त्यात त्रिपुरामधील दोन आणि केरळ, झारखंड, प. बंगाल, उत्तर प्रदेश व उत्तराखंडमधील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.

केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांचे अलिकडेच निधन झाले होते. ते प्रतिनिधीत्व करीत असलेल्या जागेसाठी मतदान होणार आहे. तर झारखंडमधील डुमरीचे आमदार जागरनाथ महातो यांचे निधन झाल्यानंतर डुमरी मतदारसंघासाठी निवडणूक घेणे आवश्यक ठरले होते.

त्रिपुरामधील ज्या दोन जागांसाठी मतदान होणार आहे, त्यातील बोक्सानगरमध्ये समसुल हक यांचे निधन झाल्याने तर धानपूरमध्ये प्रतिमा भौमिक यांनी राजीनामा दिल्याने मतदान घेणे गरजेचे ठरले होते. सात मतदारसंघात ५ सप्टेंबरला मतदान होणार असून 8 सप्टेंबरला निकाल जाहीर केला जाईल.


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .