संजय विष्णू कांबळे यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ संपन्न.
संजय विष्णू कांबळे यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ संपन्न.
मुंबई -प्रतिनिधी.
इंग्रुळ गावचे सुपुत्र संजय विष्णू कांबळे यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. मुंबई- बेस्ट मध्ये ३१ वर्ष सेवा करत असतानाच, सामाजिक कार्यकर्ते तसेच बुद्ध, शिव, शाहू , फुले, डॉ .बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवर चालणारे, सहकारी म्हणून ओळख असणारे श्री. संजय कांबळे यांचा सत्कार मा. बाबासो कांबळे व मा. जगनाथ कांबळे यांनी केला. मा. पोपट सवाखंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या संत्कार सोहळ्याला उपस्थित मा. पांङुरंग कांबळे, मा. सुदाम कांबळे व सह मित्र परिवार उपस्थित होते. मा. बाबासो कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सेवानिवृत्ती नंतर सर्वांनी आपल्या माय भुमीकडे लक्ष दिले पाहिजे, कुणाला शिक्षण घेण्यात मदत केली पाहिजे. ज्या गावच्या शाळेतुन शिकुन आपण मोठे झालो त्या शाळेसाठी काही तरी केले पाहिजे. या सर्व विषयांवरती चर्चा करण्यात आली.

Comments
Post a Comment