शिवाजी विद्यापीठाकडून गुणवंत महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा गौरव.


शिवाजी विद्यापीठाकडून गुणवंत महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा गौरव.

गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट:-

शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्तीप्राप्त विविध नऊ गुणवंत महाविद्यालयांचे प्राचार्य आणि एका अधिविभागांच्या प्रमुखांचा विद्यापीठातर्फे गौरव करण्यात आला.

विद्यापीठातील निलांबरी सभागृहात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते प्राचार्य, अधिविभागप्रमुखांचा प्रशस्तीपत्र, विद्यापीठ ग्रंथ, शाल, श्रीफळ देवून सत्कार झाला.
पदव्युत्तर प्रवेश विभागातर्फे आयोजित समारंभात आण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ बी.फार्मसी (आष्टा, जि. सांगली), संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (महागाव, ता.गडहिंग्लज), श्री. व्यंकटेश महाविद्यालय (इचलकरंजी), डी. आर. माने महाविद्यालय (कागल), श्री. यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय (वारणानगर), भोगावती महाविद्यालय (कुरूकली), शहाजी लॉ कॉलेज (कोल्हापूर शहर), पद्मभुषण डॉ. क्रांतीवीर नागनाथ अण्णा नाईकवडी कला महाविद्यालय (झरे), यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क (जकातवाडी, सातारा) यांचा गौरव झाला.
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, डॉ. एस. एस. महाजन, एम. एस. देशमुख उपस्थित होते. प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी प्रास्ताविक केले. अभिजीत लिंग्रस यांनी सूत्रसंचालन केले. उपकुलसचिव भक्ती नाळे यांनी आभार मानले.






*******************""*****************""""""""""

राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.




Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .