प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या.

 प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या.

गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट:-

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येने अवघी सिनेसृष्टीच नाही तर देशभरात खळबळ उडाली. नितीन देसाई हे नाव सर्वांच्या परिचयाचे होते. कर्जतमध्ये त्यांचा मोठा स्टुडिओ होता, या स्टुडिओतच त्यांनी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. 

रायगडचे पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी प्राथमिक माहिती दिली की, 'आज सकाळी श्री नितीन देसाई यांचा मृतदेह दोरीला लटकताना ND स्टुडीओमध्ये आढळून आला. आम्ही सर्व पैलू तपासून पाहत आहोत.

नितीन चंद्रकांत देसाई कलाविश्वातील सर्वात मोठं नाव. 2005 साली हिंदीलाही टक्कर देईल असा आपला एक खाजगी स्टुडिओ त्यांनी कर्जत येथे उभारला. मराठी प्रेक्षकांना अभिमान वाटेल असा भव्य 'एनडी स्टुडिओ' त्यांनी सुरु केला. याठिकाणी अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचं चित्रीकरण झालं आहे. अनेक सुपरहिट सिनेमांचं कलादिग्दर्शन त्यांनी केलं होतं. 'परिंदा', 'डॉन', 'लगान', 'देवदास', 'जोधा अकबर', 'हम दिल दे चुके सनम' अशा अनेक भव्य सिनेमांचं कलादिग्दर्शन त्यांनी केलं. तर 'बालगंधर्व' सारख्या मराठी सिनेमाचंही कलादिग्दर्शन केले. 'देवदास','खामोशी' या सिनेमांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .