दिव्यांगांसाठींच्या योजनांच्या माहितीसाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधा.

 दिव्यांगांसाठींच्या योजनांच्या माहितीसाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधा.

        सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : दिव्यांगांसाठी अनेकविध योजना शासन राबवित आहे. या योजनांच्या दिव्यांग व्यक्तींकरिता असलेल्या सवलती, सुविधा, लाभ दिव्यांगांना मिळवून देण्यासाठी व याबाबतच्या अधिक माहितीसाठी जिल्हा परिषद सांगलीच्या  जिल्हा समाज कल्याण कार्यालयाच्या 0233-2372714 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा dswozpsangli@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.

 शासकीय संस्थांमधून दिव्यांगांचे शिक्षण व प्रशिक्षण, स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या संस्थांमधून दिव्यांगांचे शिक्षण प्रशिक्षण, शालांत परिक्षा पूर्व शिक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृती, शालांत परिक्षोत्तर (मॅट्रीकोत्तर) शिक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृती, दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल, दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरविणे, दिव्यांग व्यक्तींना व्यवसायासाठी अर्थसहाय, दिव्यांग कल्याण राज्य पुरस्कार, दिव्यांग अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना, दिव्यांग व्यक्तींकरीता पालकत्व योजना आदि राज्य शासन पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ दिव्यांगांना मिळवून देण्यासाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .