युवराज धोंडीराम माने यांचे निधन.

कालकथीत युवराज धोंडीराम माने यांचे निधन.


कासेगाव - प्रतिनिधी.

कासेगाव (ता.वाळवा) येथील बौध्द समाजातील जेष्ठ कार्यकर्ते युवराज धोंडीराम माने (वय ८४वर्षे) यांचे वार्धक्याने आजाराने निधन झाले. त्यांनी रेल्वे खात्यातून वरिष्ठ अधिकारी म्हणून निवृत्त झाल्यानंतर बौध्द समाज व गावातील सार्वजनिक कार्यास वाहून घेतले होते. ते वाय डी भाऊ म्हणून सर्वांना परिचित होते. त्यांनी पश्चिम भाग सेवा सोसायटीत अनेक वर्षे संचालक म्हणून जबाबदारी पाहिली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,विवाहित मुलगा,मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन रविवार दि.१३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता कासेगाव येथे होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .