सोनवडे ता- शिराळा येथे 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
सोनवडे ता- शिराळा येथे 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
शिराळा- प्रतिनिधी.(नानासाहेब कांबळे.)
सोनवडे ता- शिराळा येथे 77 व स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला. सोनवडे ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले. ध्वज पूजन सोनवडे गावचे सरपंच सोनाली युवराज नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.ध्वजारोहण विश्वास सहकारी साखर कारखाना माजी संचालक शामराव बुधाजी नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
देशासाठी वीरमरण पत्करलेल्या शहिदांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने शीला फलकाचे निर्माण केले गेले.या शीला फलकांचे उद्घाटन सोनवडे गावचे सरपंच सोनाली युवराज नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. शीला फलकाच्या उद्घाटनावेळी ग्रामपंचायतचे सदस्य रवींद्र महादेव खंडागळे, गणपत मारुती पवार, पांडुरंग बाबर, दीप्ती प्रताप नाईक, मनीषा गोरख कुंभार ,मंदाताई रंगराव पाटील ,संगीता रामचंद्र राणे सर्व सदस्य उपस्थित होते,तसेच सोनवडे गावचे पोलीस पाटील योजना बाळू बागडे उपस्थित होत्या.
कार्यक्रमावेळी आरोग्य कर्मचारी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवडीचे शिक्षक तसेच हुतात्मा नानकसिग विद्यालय हुतात्मा नगर सोनवडेचे शिक्षक, शिक्षिका यांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला. यावेळी सी.एम.पाटील सर यांचा सत्कार सदस्य गणपत पवार बाळू नांगरे यांनी केला.व्ही वी पाटील सर यांचा सत्कार सरपंच सोनाली नाईक यांनी केला.संजय होरे सर यांचा सत्कार शामराव बुधाजी नाईक यांनी केला.कादंबरी रवी पाटील समृद्धी परीक्षेत केंद्रात पहिला क्रमांक आल्याबद्दल सन्मान पत्र सरपंच सोनली नाईक यांच्या हस्ते देण्यात आले.तसेच आरोग्य सेविका विद्या पाटील यांचा सत्कार सरपंच सोनाली नाईक यांनी केला.यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती युवराज नाईक, सोनवडे गावचे चेअरमन बाळू बागडे ,सोनवडे गावचे माजी सरपंच रवी यादव, बाबुराव कुंभार, लक्ष्मण बाबर, सोनवडे गावचे माजी सरपंच सुधीर बाबर, सोनवडे गावचे युवा नेते सागर कांबळे, प्रताप नाईक, ज्ञानदेव कांबळे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवडे च्या शिक्षिका विद्या पाटील, मयुरी पाटील, तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Comments
Post a Comment