स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव येवती येथे मोठ्या उत्हासात संपन्न..

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव येवती येथे मोठ्या उत्साहात संपन्न.

उंडाळे - प्रतिनिधी.

  जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा येवती. ता. कराड आणि येवती विद्यालय येवती ता. कराड या दोन्ही शाळांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. 

प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण  दिपक बाबूराव शेवाळे (शेठ)यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. येवती विद्यालय येवती या विद्यालयाचे ध्वजारोहण  सुरेश पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी येवती गावातील तसेच हणमंतवाडी व कुंभारवाडा येथील विविध संस्थांचे पदाधिकारी 'ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी' विविध मंडळाचे कार्यकर्ते 'जेष्ठ नागरिक' दोन्ही शाळांचे माजी विद्यार्थी 'तरुण कार्यकर्ते आणि शिक्षण प्रेमी दानशूर मंडळी उपस्थित होते. 

ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर प्राथमिक शाळा येवती च्या मैदानावर  सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. 

या कार्यक्रमासाठी दिपक शेवाळे  अमोल झेंडे, प्रदीप पाटील,बाजीराव शेवाळे, विक्रम,आनंदा शेवाळे, दादासाहेब शेवाळे, मारुती शेवाळे, राहुल सोरटे ,अरुण मोरे ,अंकुश मोरे ,मारुती देसाई विविध मंडळांचे कार्यकर्ते ,महिलावर्ग दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक व त्यांचे सहकारी उपस्थित होते. 

स्वातंत्र्य दिवस  निमित्ताने प्राथमिक शाळा व येवती विद्यालय येवती मधील सर्व विद्यार्थ्यांना पॅड (तगड), वाॅटर बॅग लंच बाॅक्स, पेन ,पेन्सिल,तसेच इयत्ता आठवी साठी स्कॉलरशिप आणि लेझिम साहित्य,NMMS परिक्षा यांचे प्रत्येकी पाच संच अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच

 सुरेंद्र पांडुरंग देसाई यांचे कडून पहीली ते दहावी सन 2022 - 2023 या शैक्षणिक वर्षात प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस वितरण झाले. तसेच हणमंतवाडीतील 

 अरुण ज्ञानदेव मोरे यांच्या कडून वही वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक  श्री शेवाळे सर यांनी केले. तर येवती गावातील अनेक जेष्ठ ,तरुण  मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन  कांबळे सर यांनी केले. आणि शेवट आभार  चव्हाण सर यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.


          येवती :- विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना मान्यवर.

          येवती :- विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना मान्यवर.


         



                **********************



सोनवडे तालुका शिराळा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न.


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .