केंद्र सरकारने कांद्याला ४ हजार रुपयांचा भाव द्यावा.
केंद्र सरकारने कांद्याला ४ हजार रुपयांचा भाव द्यावा शरद पवार यांची मागणी.
गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट:-
कांद्यावरील निर्यातशुल्काच्या दर वाढीच्या बाबतीत आता शरद पवारांनी आपली भूमिका मांडली आहे. केंद्र सरकारने कांद्याला ४ हजार रुपयांचा भाव द्यावा अशी मागणी पवारांनी केली आहे. २४१० रुपयांचा दर शेतक-यांना परवडणारा नाही.
यात त्यांचा उत्पादन खर्च निघणार नसल्याची भूमिका पवारांनी घेतली आहे. कांद्यावरील निर्यातशुल्क कमी करण्याची मागणीही शरद पवार यांनी केली आहे.
दरम्यान शरद पवार म्हणाले की, केंद्र सरकारने निर्यात शुल्कावर ४० टक्के कर लादल्याने नाशिकच्या सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी बंद आहे. खरेदी बंद असल्यामुळे कांदा तीनशे रुपयांनी घसरला आहे. कांद्याचा भाव २००० ते २४०० च्या दरम्यान आला आहे.
******

Comments
Post a Comment