तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

 तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.


कोल्हापुर :- प्रतिनिधी.

 तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे मार्गदर्शक संस्थापक मा.संदीप भाऊ गवई,व तथागत ग्रुपचे अध्यक्ष मा.पै.अविनाश भाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापुर  जिल्ह्यातील पेठ वडगांव ( सोनार्ली वसाहत ) येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त अंगणवाडी मध्ये शालेय वस्तू व गणवेश व शालेय बॅग वाटप करण्यात आले. तसेच कोल्हापुर जिल्हयातील तथागत ग्रुप हातकणंगले तालुक्याची कार्यकारणी गठीत करण्यात आली यावेळी हातकणंगले तालुका अध्यक्ष पदी सूरज घोलप,तालुका उपाध्यक्ष प्रज्वल घोलप यांची निवड करण्यात आली.

 यावेळी, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे कोल्हापूर जिल्हा युवा अध्यक्ष सचिन भाऊ लोखंडे, सांगली जिल्हा अध्यक्ष मा.वैभव भाऊ काळे,शिराळा तालुका अध्यक्ष कृष्णा भाऊ कांबळे,शिराळा तालुका उपाध्यक्ष विशाल साठे,महिला आघाडी शिराळा तालुका अध्यक्षा सौ. मीराताई कांबळे,शाहूवाडी तालुका उपाध्यक्ष अक्षय फाळके, अंगणवाडी शिक्षिका सौ.नीलम लोखंडे,सौ.सोनाली गोटल,आदी तथागत ग्रुपचे समस्त पदाधिकारी व ग्रामस्थ व मान्यवर उस्थितीत होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .