वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागाव मध्ये ʼमेरी माटी, मेरा देश ʼअभियानांतर्गत द्वितीय दिन ध्वजारोहन समारंभ.

 वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागाव मध्ये ʼमेरी माटी, मेरा देश ʼअभियानांतर्गत द्वितीय दिन ध्वजारोहन समारंभ.

शिराळा - प्रतिनिधी.

     दिनांक १४ ऑगस्ट २०२३ वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागाव मध्ये ʼमेरी माटी, मेरा देशʼ अभियानांतर्गत द्वितीय दिन १४ऑगस्ट ध्वजारोहन समारंभ उत्साहात संपन्न झाला .या समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक ए बी साळुंखे मॅडम यांनी केले. माननीय मुख्याध्यापक ए आर पाटील सर यांचे हस्ते ध्वजारोहण समारंभाचे प्रमुख अतिथी माजी सैन्य दलातील सेवानिवृत्त नायब सुभेदार श्री. माणिक कृष्णा पाटील यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.

 १४ ऑगस्ट चे द्वितीय दिन  ध्वजारोहण माजी सैन्य दलातील नायब सुभेदार पदी २५ वर्ष सेवा करणारे श्री. माणिक कृष्णा पाटील यांचे शुभ हस्ते करण्यात आले. ध्वजारोहन प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक उपस्थित होते .

या समारंभाचे सूत्रसंचालन एस .एच .इंगवले सरांनी केले तर आभार प्रदर्शन यु.आर. नांगरे मॅडम यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .