कासेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केदारवाडी येथे ९१ लाखांचे रक्तचंदन जप्त.

 कासेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केदारवाडी येथे ९१ लाखांचे रक्तचंदन जप्त.

कासेगाव - प्रतिनिधी.

कासेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केदारवाडी येथील जयकर तुकाराम पाटील यांच्या मालकीचे घरात युनुस भैय्या (पूर्ण नाव माहित नाही) व विजय बाळासाहेब तांबवे राहणार केदारवाडी ता- वाळवा, जि- सांगली दोघांनी दोन दिवसापूर्वी रक्तचंदन लाकडाचे ओंडके बेकायदेशीर प्रमाणे विक्री करण्याच्या उद्देशाने आणले आहेत अशी माहिती कासेगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळाली. कासेगाव पोलीस ठाणे व वन विभाग पथक यांच्या कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात जयकर तुकाराम पाटील यांच्या घरात रक्तचंदनाचे एकूण  20 लाकडी ओंडके वजन 758.400 कि. ग्रॅ. सध्याचे बाजार भाव प्रमाणे मूल्य 9100800 रुपये एवढा मुद्देमाल मिळून आला. यासंदर्भात विजय बाळासाहेब तांबे राहणार केदारवाडी तालुका शिराळा जिल्हा सांगली यास ताब्यात घेण्यात आले असून सदर आरोपी यांचे विरुद्ध कासेगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार चंद्रकांत पवार हे करीत आहेत.




Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .