उत्तरपत्रिकेचे चुकीचे मूल्यांकन विद्यार्थिनीची शिक्षण मंडळाला नोटीस.

 उत्तरपत्रिकेचे चुकीचे मूल्यांकन विद्यार्थिनीची शिक्षण मंडळाला नोटीस.

गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट :-

हुशार आणि मेहनती विद्यार्थी परीक्षेत मोठे यश मिळवण्यासाठी अभ्यास करून प्रश्नपत्रिका सोडवतात. मात्र उत्तर पत्रिका चुकीच्या पद्धतीने तपासल्यास चुकीचा निकाल होऊन त्या हुशार विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.असाच प्रकार नेवासा तालुक्यातील गीतांजली साळुंखे या विद्यार्थिनी बरोबर घडला आहे.

या विद्यार्थिनीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाला पाच लाखांची नुकसान भरपाई मागितली आहे. भरपाई न दिल्यास फौजदारी व दिवाणी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

शाळेत हुशार विद्यार्थिनी गीतांजली जनार्दन साळुंखे राहणार करजगाव तालुका नेवासा ही छत्रपती शिवाजी विद्यालयाची विद्यार्थिनी असून इयत्ता दहावीला तिला कमी गुण मिळाल्याने ती विद्यालयात द्वितीय आली. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे तिने भूगोल ,हिंदी व बीजगणित या तीन विषयांच्या उत्तर पत्रिकांच्या फोटोकॉपीची मागणी केली. त्या मिळाल्यानंतर गीतांजलीला भूगोल हिंदी व बीजगणित या विषयात बरोबर उत्तर लिहून देखील कमी गुण देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. शिक्षण मंडळाने उत्तर पत्रिकांचे विषय प्रमुख यांची गठीत समिती यांच्याकडून पुनर्मूल्यांकन करून घेऊन गीतांजलीला हिंदी या विषयात बदल नसल्याच्या शेरा देऊन गुण वाढत नसल्याचे कळवले. मात्र गीतांजली हिला बीजगणित विषयात चार तर भूगोल विषयात तीन गुण वाढत असल्याचे कळवले. निकालात दुरुस्तीचे पत्रक गीतांजली हिला देण्यात आले. त्यामुळे तिला एकूण 500 गुणांपैकी 476 गुण म्हणजेच 95.20% गुण मिळाले. या बदलामुळे गीतांजली ही शाळेत पहिल्या क्रमांकाचे उत्तीर्ण झाली.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळां कडून झालेल्या चुकीच्या उत्तर पत्रिका तपासणीच्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे मनोधैर्य खचत असून त्यांना मनस्ताप होऊन मानसिक नुकसान झाले आहे. मानसिक त्रासाची नुकसान भरपाई म्हणून रुपये पाच लाख रुपये देण्याची जबाबदारी शिक्षण मंडळाची असून ती सात दिवसात द्यावी अन्यथा फौजदारी व दिवाणी स्वरूपाची कारवाई करण्याचा इशारा एडवोकेट अशोक देवखिळे यांच्यामार्फत नोटीस पाठवण्यात आली आहे. या विद्यार्थिनीने पाठवलेल्या नोटीसवर शिक्षण मंडळ काय उत्तर देणार, याबाबतची चर्चा होत आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .