चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग बंद.
चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग बंद.
शिराळा प्रतिनिधी - नानासाहेब कांबळे.
चांदोली धरणातून प्रशासनाने सुरू केलेला पाण्याचा विसर्ग बंद केला. पावसाचा जोर वाढल्याने हा विसर्ग सुरू करण्यात आला होता पण गेल्या दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी झाल्याने धरण प्रशासनाने धरणाचे चारही वक्र दरवाजे बंद केले आहेत त्यामुळे सांडव्यातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग पूर्णतः बंद झालेला आहे.
सध्या धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून केवळ १५९० क्यूसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात सुरू आहे.धरण सध्या 83.99% एवढे भरले आहे.

Comments
Post a Comment