शिक्षकांच्या मुख्यालयात राहण्याच्या मागणीबाबत भाजप आमदार प्रशांत बंब आक्रमक शिक्षक दिनी काढणार मोर्चा .
शिक्षकांच्या मुख्यालयात राहण्याच्या मागणीबाबत भाजप आमदार प्रशांत बंब आक्रमक शिक्षक दिनी काढणार मोर्चा .
गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट:-
शिक्षकांच्या मुख्यालयात राहण्याच्या मागणीबाबत भाजप आमदार प्रशांत बंब पुन्हा एकदा आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. आमदार प्रशांत बंब हे येत्या 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी शिक्षक मुख्यालयी राहण्याच्या मुद्द्यावरून मोर्चा काढणार आहेत.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या मुख्यालयाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी हाच मुद्दा विधानसभेत देखील मांडला होता. मुख्यालयाचा ठिकाणी राहत नसलेल्या शिक्षकांचे घरभाडे भत्ता बंद करण्याची मागणी देखील आमदार बंब यांच्याकडून सतत केली जात आहे. त्यामुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये बंब यांच्याबद्दल रोष पाहायला मिळाला होता. अनेक ठिकाणी शिक्षकांनी आमदार बंब यांच्याविरोधात आंदोलन देखील केले होते. मात्र, मागील काही दिवसांत हा मुद्दा मागे पडला असल्याचे चित्र असतानाच आता बंब पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.


Comments
Post a Comment