कोडोली हायस्कूल मध्ये 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न.

 कोडोली हायस्कूल मध्ये 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न.


कार्वे प्रतिनिधी :-

भारती विद्यापीठाचे, हौसाबाई विठ्ठलराव पाटील प्रशालेमध्ये 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संभाजी पाटील होते .शाळेचे ध्वजारोहण श्री.अक्षय पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या समवेत तिरंगा ध्वजास मानवंदना दिली. शाळेतील विद्यार्थिनींनी समूहगीते, देशभक्तीपर गीते सादर केली. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा दिल्या. तसेच विद्यार्थिनींनी झांज पथकाचे उत्कृष्ट सादरीकरण केले. या कार्यक्रमा प्रसंगी  शुभसंदेश मा.श्री मोरे आय. जे. यांनी दिला. आभार सौ. जाधव व्ही. ए. यांनी मानले,सूत्रसंचालन सौ. संदे एस. ए. यांनी केले. तसेच या कार्यक्रमास प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,माजी सैनिक नेर्लेकर आण्णा, चंद्रकांत पाटील, संभाजी जगताप, बाजीराव जगताप सर्व विद्यार्थी,पालक, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.





Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .