वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागाव मध्ये स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न.
वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागाव मध्ये स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न.
शिराळा -प्रतिनिधी.
वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागाव मध्ये स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन संपन्न झाला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत ए बी साळुंखे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाचे स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापनदिन ध्वजारोहण विद्यालयाचे मुख्याध्यापक ए आर पाटील सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात राष्ट्रगीत ,झेंडा गीत, सारे जहासे अच्छा आणि महाराष्ट्र राज्य गीत घेण्यात आली.या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे विद्यमान संचालक एम डी पाटील सर यांचा शिव केदार विद्यालय कांदे येथील मुख्याध्यापक म्हणून सेवा निवृत्त झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष व माजी सभापती चंद्रकांत पाटील भाऊ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कुमारी दीपाली चंद्रकांत शिद एग्रीकल्चर सायंटिफिक रिक्रुटमेंट बोर्ड नवी दिल्ली यांच्यावतीने नेट परीक्षेत उज्वल यश संपादन केल्याबद्दल भैरवनाथ दूध संस्थेचे चेअरमन शामराव पाटील आप्पा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक ए आर पाटील सर यांना वाढदिवसानिमित्त सर्व संस्था पदाधिकाऱ्यांनी सन्मानपूर्वक शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.
क.आर्या संतोष घागरे इ.७वी. हिने स्वातंत्र्य दिनानिमित्त इंग्रजी मधून भापण केले.
या कार्यक्रमाप्रसंगी माजी सभापती व संस्था अध्यक्ष माननीय चंद्रकांत पाटील भाऊ, सागाव गावचे माजी उपसरपंच माननीय सत्यजित पाटील भैय्या श्री भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी सागावचे संचालक विलासराव पाटील, प्रकाश कांबळे, मानसिंग पाटील, रघुनाथ पवार आदी उपस्थित होते तसेच श्री भैरवनाथ दूध संस्था चेअरमन व सदस्य , श्री भैरवनाथ पतसंस्था चेअरमन व सदस्य त्याचप्रमाणे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, नागरीक, शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी,विद्यार्थींनी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .ध्वजारोहण कार्यक्रमानंतर मा.मुख्याध्यापक अरूण पाटील सर यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए बी साळुंखे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन एस एच इंगवले सर यांनी मानले.



Comments
Post a Comment