मातोश्री सहकारी पतसंस्थेत 8 ते 10 कोटी रुपयांचा अपहार-विश्वजित पाटील उंडाळकर
उंडाळे-( प्रदीप पाटील )
मातोश्री सहकारी पतसंस्था मलकापूर या संस्थेत 8 ते 10 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे विश्वजित दादांच्या निदर्शनास काही कर्मचारी व ठेवीदारांनी आणून दिले.6 कोटी रुपये रेग्युलर कर्ज वाटप करण्यात आले आले .ते ही विद्यमान संचालक असणाऱ्या व माजी अध्याक्ष असणाऱ्या अशोक भावके याच्या शैक्षणिक संस्थेयील कामगारांच्या नावे घेतलेले आहे तसेच उर्वरित 5 कोटी तसेच इतर बँकेतील ठेवी बिल्डिंग फंड नफा मिळून 8 ते10 कोटी रुपये विद्यमान संचालक मंडळाने परस्पर कडून घेतलेले आहेत त्याचे कोणतेही ताळेबंद नाहीत तसेच शासकीय ऑडिट पण झालेले नाही ह्यात संचालक मंडळ तसेच लेखापरीक्षक योगेश रेळेकर पण तितकाच जबाबदार आहे .रोजच्या कॅश वेव्यहाराच काहीच ताळेबंद नाहित कामगारांचे पगार दिले गेले नाहीत गेली दोन तीन महिने झाले सर्व शाखा बंद अववस्थेत आहेत .याची सखोल चौकशी करून संचालक व लेखापरीक्षक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्या मालमत्ता जप्त करून ठेवीदारांचे पैसे परत द्यावे अशी मागणी विश्वजित दादांनि आज सहकार मंत्री मा. बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन केली तसेच उपनिबंधक यांचेकडे केली

Comments
Post a Comment