यशस्वी जीवनाचा राजमार्ग म्हणजे स्पर्धा परीक्षा . प्रा. बनसोडे जी. एस.
उंडाळे - ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय उंडाळे आणि अग्रणी महाविद्यालय सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा व व्यवसाय संधी या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराडचे प्रा. बनसोडे जी. एस. प्रमुख उपस्थितीत प्रा सागरे व्ही. एस. तर अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य शेख जे. एस .हे होते.विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनापासून स्पर्धापरीक्षांची तयारी करणे गरजेचे आहे. महाविद्यालयातील शिक्षण संपल्यानंतर वेगवेगळे व्यवसाय शोधण्याव्यतिरिक्त महाविद्यालयीन जीवनात स्पर्धापरीक्षांची तयारी केली तर आपले जीवन सुसह्य करता येते. या माध्यमातून जनतेची सेवा करता येईल यासाठी स्वतःहून अभ्यास करावा, परीक्षांची माहिती घ्यावी, सुरुवातीपासून कष्ट घेतले तर यश लवकर मिळते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जमीर पटेल यांनी केले व सूत्रसंचालन प्रा.रूपाली शिंदे यांनी केले तर आभार प्रा.प्रवीण पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी ,विद्यार्थीनी तसेच प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी , उपस्थित होते.

Comments
Post a Comment