साळशिरंबे गावात शिवजयंती उत्साहात साजरी .
प्रतिनिधी -
बहुजन प्रतिपालक , कुळवाडी भूषण ,छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साळशिरंबे येथे मोठ्या धूमधडाक्यात साजरी झाली . समस्त शिवप्रेमींच्या कडून या जयंतीमध्ये सहभाग नोंदवण्यात आला. यावेळी क्रांती ज्योत पन्हाळगडावरून आणण्यात आली.
सर्व ग्रामस्थांनी महाराजांना मानाचा मुजरा केला. सायंकाळी मिरवणुकीमध्ये सर्व लहान थोर अबालवृद्धांनी शिवजयंतीमध्ये उत्साहाने सहभाग घेवून शिवजयंतीच्या मिरवणुकीची शोभा वाढवली .या सर्व कार्यक्रमाचे आयोजन हे सर्व मंडळाचे कार्यकर्ते , ग्रामपंचायत सरपंच ,सदस्य, व इतर सर्व मान्यवर मंडळींनी केले .

Comments
Post a Comment