कला व वाणिज्य महाविद्यालय उंडाळेचे घोगाव येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन संप्पन्न.
ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय उंडाळे व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीराचे घोगाव ता. कराड या ठिकाणी उद्घाटन समारंभ संपन्न झाला. या समारंभासाठी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री जयसिंगराव पाटील (बापू) व प्रमुख पाहुणे ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे संचालक मा. श्री शंकर हरी पाटील उपस्थित होते. तर या समारंभाचे अध्यक्ष घोगाव ग्रामपंचायत सरपंच सौ. राणी अशोक भेदाटे ह्या होत्या प्रमुख उपस्थिती म्हणून ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे सचिव श्री बाबुराव रामचंद्र यादव हे लाभले होते.या समारंभासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे प्र.प्रा.व राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. जावेद शेख यांनी केले. या उद्घाटन समारोहाचे प्रास्ताविक करताना शिबिराच्या कामाचे स्वरूप सांगून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.
या समारंभाचे उद्घाटक श्री जयसिंगरावजी पाटील (बापू )यांनी श्रमसंस्कार शिबिरार्थींना राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व सांगून ही आपली सामाजिक जबाबदारी आहे असे उद्गार काढले. या समारंभाचे प्रमुख पाहुणे श्री शंकर हरी पाटील यांनी अशा श्रमसंस्कार शिबिरामुळे व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते असे वक्तव्य केले. अध्यक्षीय भाषणामध्ये घोगाव ग्रामच्या सरपंच सौ राणी भेदाटे यांनी या श्रमसंस्कार शिबिराला पूर्ण सहकार्य करू अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी,सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनी घोगाव गावचे ग्रामस्थ उपस्थित होते या समारंभाचे आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे सहसमन्वयक प्रा. योगेश वाघमारे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. श्रीदेवी घुगरे यांनी केले

Comments
Post a Comment