Posts

Showing posts from July, 2020
Image
कोडोली गावात 'अर्सेनिक अल्बम ३०' गोळ्यांचे वाटप. कार्वे - प्रतिनिधी,  कोडोली गावातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी युवकांचा पुढाकार वाढत आहे.रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आवश्यक असणार्या आर्सिनिक अल्बम 30 या गोळ्या पुर्ण गावात प्रत्येकास देण्याचे काम  श्री.उमेश विठ्ठल पाटील यांनी केले.या कामात डाँ.विजय जगताप.व डाँ.जगदीश जगताप .यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच या गोळ्या प्रत्येक व्यक्तीस पोहच करण्याचे काम आशासेविका,अंगणवाडी सेविका ,सरपंच,कोरोना यौद्धे युवक यांनी पार पाडले  ग्रामस्थांनी सदर औषधाचे सेवन करून स्वतःचे, कुटुंबाचे व गावाला कोरोनापासून दूर ठेवण्याचे आव्हान करण्यात आले.  पोलिस पाटील  व कोरोना दक्षता कमिटी कोडोली  कोरोना प्रदुरभाव रोखण्यासाठी कोडोली गावात आर्सिनिक अल्बम 30 या गोळ्याचे वाटप करण्यात आले.या गोळयाने सर्व गावातील लोकांची रोग प्रतिकारक शक्ति वाढण्य स उपयुक्त आहेत. उमेश पाटील (आप्पा)यांच्या कडुन सर्व गावात वाटप करण्यात आले.त्यांचे सर्व ग्रामस्थ ,ग्रामपंचायत सदस्य ,कोरोना दक्षता कमिटी,सरपंच ,तलाठी,पोलिस पाटील,ग्रामसेवक,उपसरपंच, यांच्या ...
Image
कोरोनाच्या संकटाने बत्तीस शिराळ्यात यंदा नागपंचमी साध्या पद्धतीने घरातुनच साजरी "शिराळा येथील नागपंचमी उत्सवावर कोरोनाचं संकट " आनंदा सुतार शिराळा,  प्रतिनिधी कोरोना माहारीच्या पार्श्वभूमीवर शिराळा वासीयांना प्रतिकात्मक  नागांची मिरवणूक नाही, अंबामाता दर्शन ना, पालखी दर्शन फक्त घरोघरी महिलांनी प्रतिकात्मक नागाची पूजा करून साध्या पद्धतीने नागपंचमी साजरी केली  बत्तीस शिराळा नागपंचमी च्या इतिहासात हजारो भक्तांन विना  नागपंचमी घरगुती पद्धतीने साजरी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. शिराळकर पहील्यांदा अंबामाता मंदिरात नाग प्रतिमेचे पूजन करून नंतर घरी पूजा करतात परंतु यावर्षी मंदिरात जाण्यासाठी व मानाच्या पालिकेच्या दर्शनाला बंदी असल्याने महिलांनी घरीच नाग प्रतिमेची पूजा करून घरातूनच आंबा मातेचे दर्शन घेत नैवद्य दाखवला सकाळी अंबामाता मंदिरात पुजारी यांनी विधिवत पूजा व आरती केली दुपारी एक वाजता मानकरी महाजन यांच्या घरी नागाची विधिवत पूजा करून घरातून मानाची पालखी अंबामाता मंदिरात नेण्यात आली पालखी सोबत पांडुरंग महाजन, प्रणव महाजन, अनिरुद्ध महाजन ,श्रेयस महाजन, सागर कोतवाल...
Image
मलकापूरच्या शास्ञीनगरमध्ये डेंग्यूचे थैमान. शहरातील डेग्यूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नगरपरिषदेस दिले निवेदन. मलकापूर:दि.१३  येथील भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष तानाजी देशमुख यांनी शास्ञीनगर विभागामध्ये वाढणार्‍या डेंग्यू आजारा बाबत मलकापुरच्या मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांना शहरातील डेंग्यूचा वाढणारा प्रादूर्भाव रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्यासंदर्भात आज निवेदन दिले.  यावेळी नगरसेवक अजित थोरात, आबासो सोळवंडे, राजू मुल्ला,सुर्यकांत खिलारे, सुरज शेवाळे, आण्णा माळी यांची उपस्थिती होती मलकापुर शहरातील प्रभाग क्र ४ मधील शास्ञीनगर पस्चिम विभागामध्ये सध्या डेंग्यू आजाराने थैमान घातले असुन. गेल्या १५ दिवसांमध्ये सोसायटी पेट्रोल पंप ते हौसाई कन्याशाळा परिसरामध्ये डेंग्यू आजाराचे तब्बल १३ रुग्ण आढळून आलेले आहेत. काहींवर सध्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार देखील सुरु आहेत. या विभागातील  एका कुटूंबाला तर ६५ हजारांचा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागलेला आहे. पावसाळा सुरु असल्याने साथीचे रोग देखील वाढू लागलेले आहेत . कोरोनामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असताना आता नव्या ...
Image
पाच दिवस शेडगेवाडी बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय. "बंद काळात व्यापारी व नागरीकांनी देखील घरातच राहून कोरोना साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन". शिराळा  -  प्रतिनिधी (आनंदा सुतार)  येळापुर  येथे एक रुग्ण पाॅझिटीव्ह आल्याने   शेडगेवाडी येथील व्यापाऱ्यांनी   बाजारपेठ  कडकडीत पणे पाच दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय  घेण्यात आला.मागील काही दिवसांमध्ये शिराळा तालुक्यात विविध भागांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्ये मध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच येळापुर येथे एक रुग्ण सापडल्याने भितीचे वातावरण झाले आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शनिवार पासुन पुढील पाच दिवस  औषधाची दुकाने,  व इतर अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.  नागरिकांनी देखील घरातच राहून कोरोना साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यत आले असुन अत्यावश्यक गटात मोडणा-या किराणा ,दुध विक्री, भाजी बाजार ही बंद ठेवण्यास दुकानदारांनी संमती दिली शेडगेवाडी बाजार पेठ कडकडी...
Image
कोडोली ग्रामपंचायत  ता.कराड येथे  कुस्ती मॅटचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते वितरण . कार्वे -  प्रतिनिधी , कोडोली ता.कराड येथे जिल्हा वार्षिक योजनाअंतर्गत क्रीडांगण विकास अनुदान योजना २०१९-२० मधून मंजूर झालेल्या कुस्ती मॅटच्या वितरण महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्यचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील  यांच्या हस्ते करण्यात आले ,यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत क्रीडांगण विकास अनुदान योजना सन-२०१९-२०, जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा मार्फत मंजूर झालेल्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, अनुदानित शाळा, महाविद्यालयांना क्रीडा साहित्याचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.यानुसार विविध संस्थांना कुस्ती मॅटचे वितरण नामदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते  करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, व शिवराज मोरे, हिंद केसरी पै.संतोष वेताळ,  बाजीराव शेवाळे,  कोडोलीचे सरपंच सूर्यकांत सुतार, उपसरपंच घनश्याम जगताप,   बाळासाहेब ...
Image
मानव कल्याणकारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जपली सामाजिक बांधिलकी.  " बेघर, निराधाराला, केली आत्मियतेने मदत".  कराड - प्रतिनिधी,  मानव कल्याणकारी संघटना महाराष्ट्रभर मा.सलिम पटेल यांच्या नेत्रुत्वामध्ये नेहमीच गोरगरीबांची मदत करत असते. मानव कल्याणकारी संघटनेचे ओगलेवाडी विभाग अध्यक्ष रोहीत कुंभार यांना एक 40- 50 वयाचा व्यक्ती रस्त्या कडेला पडलेल्या बेघर व निराधार अवस्थेमध्ये सापडला. संघटनेच्या टीम ने विचारपुस केली असता असे अढळुन आले की तो व्यक्ती उत्तर प्रदेशचा असुन त्याचा हात मोडलेला आहे 3 दिवसा पासुन तो उपाशी आहे. आजु बाजुला मदत मागीतली असता कोरोनाच्या भीतीने कोणीही जवळ जान्यास तयार न्हवते. मग युवकचे तालुका अध्यक्ष आसिफ पटेल, तालुका युवक संघटक अभीजीत पाटील, ओगलेवाडी प्रभाग युवक अध्यक्ष रोहीत कुंभार, केदार जेधे यांनी कोरोनाची काळजी घेत त्या व्यक्तीला उचलुन अंघोळ घातली व त्याला कपडे घालुन त्याला दवाखाण्याची नेण्याची सोय केली. शेवटी तो व्यक्ती भाऊक झाला. त्यावेळी आसिफ पटेल, रोहीत कुंभार, अभिजीत पाटील व केदार जेधे यांनी निराधाराची अशीच सेवा आम्ही करत राहु अशी शप्पत ...
Image
राजगृहावरील हल्ल्याच्या निषेधार्थ भीम आर्मीने दिले निवेदन. " सातारा जिल्ह्याच्या वतीने दिले निवेदन त्वरीत अटक करून देशद्रोहाचा गुन्हा चालवण्याची केली मागणी " कराड-  प्रतिनिधी ,  राजगृहावर  हल्लाच्या निषेधार्त दोषींच्यावर कडक कारवाई व्हावी व त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा चालवावा अशी मागणी सातारा जिल्हा भीम आर्मीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली .      यावेळी भीम आर्मीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जावेद नायकवडी ,सातारा जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे, जिल्हा संघटक अशोक मस्के, जिल्हा संघटक विद्यार्थी आघाडी राहील खान, कराड तालुकाध्यक्ष भागवत कांबळे,कराड शहराध्यक्ष जुम्मन मेटकरी व कार्यकर्ते उपस्थित होते .
Image
सेंद्रिय खतांचा उपयोग करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन.  उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ. उंडाळे ता : 4  :  शेतकऱ्यानी उत्पादन वाढीबरोबर जमीनाचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय खतांचा उपयोग करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ यांनी केले . माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषीदिन कार्यक्रमात ते बोलत होते . पंचायत समिती सदस्य काशीनाथ कारंडे , तालुका कृषी अधिकारी मुल्ला , मंडल कृषी अधिकारी तोरणे प्रमुख उपस्थित होते . श्री वेताळ म्हणाले ; अलीकडे उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे . मात्र रासायनिक खातांच्या अतिरेकी वापरामुळे जमिनीचा पोत खराब होऊन त्याचा उत्पादन कमी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.यासाठी माती परीक्षण करून पिकांना जेवढी आवश्यकता तेवढाच खतांचा वापर करावा .याबरोबरच आता सेंद्रिय शेतीकडे वळावे लागेल . सेंद्रिय उत्पादनाला बाजारपेठेत मोठी मागणी आहे .यासाठी शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या योजनांचा लोकांनी लाभ घ्यावा .नाडेफ व गांडूळखत तयार करण्यासाठी अनुदान यो...