कोरोनाच्या संकटाने बत्तीस शिराळ्यात यंदा नागपंचमी साध्या पद्धतीने घरातुनच साजरी
"शिराळा येथील नागपंचमी उत्सवावर कोरोनाचं संकट "
कोरोना माहारीच्या पार्श्वभूमीवर शिराळा वासीयांना प्रतिकात्मक
नागांची मिरवणूक नाही, अंबामाता दर्शन ना, पालखी दर्शन फक्त घरोघरी महिलांनी प्रतिकात्मक नागाची पूजा करून साध्या पद्धतीने नागपंचमी साजरी केली बत्तीस शिराळा नागपंचमी च्या इतिहासात हजारो भक्तांन विना नागपंचमी घरगुती पद्धतीने साजरी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. शिराळकर पहील्यांदा अंबामाता मंदिरात नाग प्रतिमेचे पूजन करून नंतर घरी पूजा करतात परंतु यावर्षी मंदिरात जाण्यासाठी व मानाच्या पालिकेच्या दर्शनाला बंदी असल्याने महिलांनी घरीच नाग प्रतिमेची पूजा करून घरातूनच आंबा मातेचे दर्शन घेत नैवद्य दाखवला सकाळी अंबामाता मंदिरात पुजारी यांनी विधिवत पूजा व आरती केली दुपारी एक वाजता मानकरी महाजन यांच्या घरी नागाची विधिवत पूजा करून घरातून मानाची पालखी अंबामाता मंदिरात नेण्यात आली पालखी सोबत पांडुरंग महाजन, प्रणव महाजन, अनिरुद्ध महाजन ,श्रेयस महाजन, सागर कोतवाल, काशिनाथ नलवडे, अक्षय नरवडे हे उपस्थित होते मंदिरात दर्शन घेऊन पालखी परत घेण्यात आली.
बत्तीस शिराळा येथे यावर्षी नागपंचमी व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वन विभाग व प्रशासनाकडून खबरदारी घेत नागपंचमी उत्सवाची शेकडो वर्षांपासून सुरू असलेली परंपरा या वर्षी प्रशासनाच्या नियमाच्या आधीन राहुन साध्या पद्धतीने साजरी केली.
अंबामाता मंदिर बंद ठेवण्यात आले होते मंदिरात फक्त ५ लोकांना पूजेसाठी तर पालखी सोहळ्यासाठी १० लोकांना परवानगी देली होती. नागपंचमी उत्सवाची शेकडो वर्षांपासून सुरू असलेली परंपरा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर खंडीत झाली आहे. मात्र शिराळाकरांनी देखील वन विभाग आणि पोलिसाच्या आवाहनास प्रतिसाद देत शांततेने आणि घरीच प्रतिकात्मक नागाचे पूजन करत नागपंचमी साजरी केली.
सांगली जिल्ह्यातील शिराळा गावामध्ये दरवर्षी श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी उत्साहात साजरी केली जाते. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मात्र मागील काही वर्षांपासून नागपंचमी साजरी करण्यावर अनेक बंधने आली आहेत. त्यात जिवंत नागाची पूजा करण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे.
येथील जनता हजारो वर्षांपासून जिवंत नागाची पूजा करत आहे.
महायोगी गोरक्षनाथ शिराळा येथे तिन दिवस वास्तव्य करत असताना शिराळा येथील महाजन यांच्या घरी महायोगी गोरक्षनाथ भिक्षा मागण्यास आले होते. यावेळी भिक्षा वाढण्यास वेळ झाला म्हणुन गोरक्षनाथ यांनी वेळ का झाला असे त्या घरातील महीलेला त्यांनी प्रश्न विचारला त्यावेळी त्या महीलेने आपण नागाची पूजा करत होते असे सांगितले.पण त्याचवेळी महायोगी गोरक्षनाथ यांनी माई तु जिवंत नागाची पूजा कर असे म्हणत त्यांनी आपल्या झोळीतुन विभुती काढुन त्या मातीच्या नागमुर्तीवर टाकली व त्यास जिवंत करुन त्या महिलेला सांगितले की आज पासुन तुम्ही जिवंत नागाची पुजा करा आणि तेव्हापासून ही परंपरा शिराळा यथे सुरू झाली अशी अख्यायीका सांगीतली जाते तसा श्रीनाथलीलामृत या ग्रंथात याचा उल्लेख आहे.
ही नागपंचमी पाहण्यासाठी काही वर्षांपूर्वी अनेक राज्य तसेच परदेशातुन लोकांची गर्दी होत असे. शिराळा येथील सर्व घरात नागपंचमी दिवशी ही जिवंत नागांची पूजा करण्याची परंपरा शेकडो वर्षापासून चालत आलेली असुन ही परंपरा न्यायालयाच्या निर्णयानंतर खंडित झाली आहे

Comments
Post a Comment