पाच दिवस शेडगेवाडी बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय.

"बंद काळात व्यापारी व नागरीकांनी देखील घरातच राहून कोरोना साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन".


शिराळा  -  प्रतिनिधी (आनंदा सुतार)
 येळापुर  येथे एक रुग्ण पाॅझिटीव्ह आल्याने   शेडगेवाडी येथील व्यापाऱ्यांनी   बाजारपेठ  कडकडीत पणे पाच दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय  घेण्यात आला.मागील काही दिवसांमध्ये शिराळा तालुक्यात विविध भागांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्ये मध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच येळापुर येथे एक रुग्ण सापडल्याने भितीचे वातावरण झाले आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शनिवार पासुन पुढील पाच दिवस  औषधाची दुकाने,  व इतर अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.  नागरिकांनी देखील घरातच राहून कोरोना साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यत आले असुन अत्यावश्यक गटात मोडणा-या किराणा ,दुध विक्री, भाजी बाजार ही बंद ठेवण्यास दुकानदारांनी संमती दिली शेडगेवाडी बाजार पेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली आहे.त्याच बरोबर ग्रामपंचायती कडुन संपुर्ण बाजार पेठेत औषध फवारणी करण्यात आली आहे.
                 
                   

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .