सेंद्रिय खतांचा उपयोग करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन.
 उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ.



उंडाळे ता : 4  : 
शेतकऱ्यानी उत्पादन वाढीबरोबर जमीनाचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय खतांचा उपयोग करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ यांनी केले .
माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषीदिन कार्यक्रमात ते बोलत होते . पंचायत समिती सदस्य काशीनाथ कारंडे , तालुका कृषी अधिकारी मुल्ला , मंडल कृषी अधिकारी तोरणे प्रमुख उपस्थित होते .
श्री वेताळ म्हणाले ; अलीकडे उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे . मात्र रासायनिक खातांच्या अतिरेकी वापरामुळे जमिनीचा पोत खराब होऊन त्याचा उत्पादन कमी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.यासाठी माती परीक्षण करून पिकांना जेवढी आवश्यकता तेवढाच खतांचा वापर करावा .याबरोबरच आता सेंद्रिय शेतीकडे वळावे लागेल . सेंद्रिय उत्पादनाला बाजारपेठेत मोठी मागणी आहे .यासाठी शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या योजनांचा लोकांनी लाभ घ्यावा .नाडेफ व गांडूळखत तयार करण्यासाठी अनुदान योजना आहे .नजीकच्या मंडल कार्यालयाशी संपर्क साधून याचा लाभ घ्यावा .बांधावरची फळबाग शेती याला ही शासन अनुदान देत आहे .यामुळे शेतकऱ्याना आपल्या बांधावर सर्वच फळझाडांची लागवड करता येईल .त्यामुळे कोकणातील हापूस आपल्या बांधावर तयार होऊन त्याची चव शेतकऱ्याला चाखता येईल .तालुका कृषी अधिकारी मुल्ला यांनी ही शासकीय योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केले . सोशल डिस्टनसींग चे पालन करून प्रयोगशील शेतकरी उपस्थित होते . राहुल पाटील यांनी प्रास्ताविक केले .तोरणे यांनी आभार मानले .

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .