कोडोली ग्रामपंचायत ता.कराड येथे कुस्ती मॅटचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते वितरण .
कार्वे - प्रतिनिधी ,कोडोली ता.कराड येथे जिल्हा वार्षिक योजनाअंतर्गत क्रीडांगण विकास अनुदान योजना २०१९-२० मधून मंजूर झालेल्या कुस्ती मॅटच्या वितरण महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्यचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले ,यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत क्रीडांगण विकास अनुदान योजना सन-२०१९-२०, जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा मार्फत मंजूर झालेल्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, अनुदानित शाळा, महाविद्यालयांना क्रीडा साहित्याचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.यानुसार विविध संस्थांना कुस्ती मॅटचे वितरण नामदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, व शिवराज मोरे, हिंद केसरी पै.संतोष वेताळ, बाजीराव शेवाळे, कोडोलीचे सरपंच सूर्यकांत सुतार, उपसरपंच घनश्याम जगताप, बाळासाहेब जगताप माजी संचालक य.मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना , सुधाकर जगताप पोलीस पाटील कोडोली ,विक्रम थोरात, अशोक जगताप, प्रकाश जगताप, आनंदराव मोरे, कुस्ती पदक प्राप्त विद्यार्थी, जनरल चॅम्पियन क्रीडा विभाग अनिकेत वाघमोडे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय पाटील यांनी केले तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments
Post a Comment