मलकापूरच्या शास्ञीनगरमध्ये डेंग्यूचे थैमान.
शहरातील डेग्यूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नगरपरिषदेस दिले निवेदन.


मलकापूर:दि.१३ 
येथील भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष तानाजी देशमुख यांनी शास्ञीनगर विभागामध्ये वाढणार्‍या डेंग्यू आजारा बाबत मलकापुरच्या मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांना शहरातील डेंग्यूचा वाढणारा प्रादूर्भाव रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्यासंदर्भात आज निवेदन दिले.  यावेळी नगरसेवक अजित थोरात, आबासो सोळवंडे, राजू मुल्ला,सुर्यकांत खिलारे, सुरज शेवाळे, आण्णा माळी यांची उपस्थिती होती
मलकापुर शहरातील प्रभाग क्र ४ मधील शास्ञीनगर पस्चिम विभागामध्ये सध्या डेंग्यू आजाराने थैमान घातले असुन. गेल्या १५ दिवसांमध्ये सोसायटी पेट्रोल पंप ते हौसाई कन्याशाळा परिसरामध्ये डेंग्यू आजाराचे तब्बल १३ रुग्ण आढळून आलेले आहेत. काहींवर सध्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार देखील सुरु आहेत. या विभागातील  एका कुटूंबाला तर ६५ हजारांचा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागलेला आहे. पावसाळा सुरु असल्याने साथीचे रोग देखील वाढू लागलेले आहेत . कोरोनामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असताना आता नव्या संकटांचा सामना करताना लोक अस्वस्त झाली आहेत. वाढीव संकलित कर, बिजबिले , घरखर्च याने हैरान झालेल्या नागरिकांच्या खिशाला काञी  लागत आहे. तसेच सर्व टाळेबंदीमुळे सर्व सामांन्यांची आर्थिक गणिते कोलमडली आहेत  याचा विचार नगरपरिषदेने करावा. 
नोव्हेबर २०१३ रोजी डेग्यूने शहरातील एका नागरिकाला या आजाराने प्राण गमवावा लागलेला आहे. 
कोरोनाच्या प्रादूर्भावाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेले आहे. देशासह राज्यात टाळेबंदी झाल्याने सर्व सामांन्य नागरिक  मेटाकुटीला आलेला आहे. शहरातील कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यात प्रशासनाला सध्यातरी यश  आलेले आहे. कृष्णा हाॅस्पिटलच्या यशस्वी उपचार पध्दतीने शहरातील सर्व रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत असे असताना डेंग्यू आजाराने डोके वर काढलेले आहे. 
आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तरी या परिसरातील मोकळ्या प्लाॅटमध्ये वाढलेली झूडपे, बंद इमारती , पाणी साचलेली डबक्यांची स्वच्छता करुन औषध फवारणीसह इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या आरोग्यविभागाला योग्य त्या सुचना द्याव्या. 
सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही  करावी असे निवेदनात म्हटले आहे. 
यावेळी  भाजपा नगरसेवक अजित थोरात ,आबासो सोळवंडे,राजू मुल्ला, सुर्यकांत खिलारे, सुरज शेवाळे, आण्णा माळी, यांची उपस्थिती होती. 
            
                 

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .