मानव कल्याणकारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जपली सामाजिक बांधिलकी.
" बेघर, निराधाराला, केली आत्मियतेने मदत".
कराड - प्रतिनिधी,
मानव कल्याणकारी संघटना महाराष्ट्रभर मा.सलिम पटेल यांच्या नेत्रुत्वामध्ये नेहमीच गोरगरीबांची मदत करत असते. मानव कल्याणकारी संघटनेचे ओगलेवाडी विभाग अध्यक्ष रोहीत कुंभार यांना एक 40- 50 वयाचा व्यक्ती रस्त्या कडेला पडलेल्या बेघर व निराधार अवस्थेमध्ये सापडला. संघटनेच्या टीम ने विचारपुस केली असता असे अढळुन आले की तो व्यक्ती उत्तर प्रदेशचा असुन त्याचा हात मोडलेला आहे 3 दिवसा पासुन तो उपाशी आहे. आजु बाजुला मदत मागीतली असता कोरोनाच्या भीतीने कोणीही जवळ जान्यास तयार न्हवते. मग युवकचे तालुका अध्यक्ष आसिफ पटेल, तालुका युवक संघटक अभीजीत पाटील, ओगलेवाडी प्रभाग युवक अध्यक्ष रोहीत कुंभार, केदार जेधे यांनी कोरोनाची काळजी घेत त्या व्यक्तीला उचलुन अंघोळ घातली व त्याला कपडे घालुन त्याला दवाखाण्याची नेण्याची सोय केली. शेवटी तो व्यक्ती भाऊक झाला. त्यावेळी आसिफ पटेल, रोहीत कुंभार, अभिजीत पाटील व केदार जेधे यांनी निराधाराची अशीच सेवा आम्ही करत राहु अशी शप्पत घेतली. व असे निराधार व्यक्ती दिसल्यास संघटनेशी संपर्क करण्याचे अवाहन लोकांना केले.संघटनेच्या या समाजाभिमुख कार्यामुळे सर्व स्तरातून या संघटनेचे कौतुक होत आहे.

Comments
Post a Comment