Posts

Showing posts from April, 2023

ओंमकार गणपत कांबळे यांचे निधन.

Image
  ओमकार गणपत कांबळे यांचे निधन. शिराळा-प्रतिनिधी. ओमकार गणपत कांबळे यांचे निधन   29/04/2023 रोजी झाले. ते गुढे ता- शिराळा, जि- सांगली येथील रहिवासी होते. गोंडवाना न्यूजचे शिराळा प्रतिनिधी  नानासाहेब कांबळे यांचे मावसभाऊ होत.  त्यांच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. जलदान व रक्षा विसर्जन  सोमवार   01/05/2023 रोजी गुढे ता.शिराळा जि- सांगली येथे होईल.

स्वच्छतेमध्ये तासगाव नगरपरिषदेचे काम कौतुकास्पद - केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड

Image
  स्वच्छतेमध्ये तासगाव नगरपरिषदेचे काम कौतुकास्पद - केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड    सांगली दि. 24 (जि.मा.का.) :  तासगाव नगरपरिषदेने स्वच्छतेच्या कामात उत्कृष्ट काम केले असून त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी आज तासगाव येथे बोलताना काढले.  तासगाव नगरपरिषदेच्या वतीने दत्त मंदिर समोरील नगरपरिषदेच्या जागेमध्ये सुशोभीकरण, हरित पट्टे विकास व उद्यान विकसित करणे, फूड पार्क या कामांचे भूमिपूजन व पायाभरणी समारंभ केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आला.  यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुमनताई पाटील, तहसीलदार रवींद्र रांजणे, गट विकास अधिकारी श्री. मोहिते, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.  केंद्रीय वित्त राज्यमंत्री श्री. कराड म्हणाले, तासगाव शहराचा कल्पकतेने विकास होत असून यामध्ये स्वच्छतेच्या कामाचा मोठा वाटा आहे.  पाणीपुरवठा ड्रेनेज व शहराची अंतर्गत स्वच्छता यामुळे नगरपरिषदेने राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे....

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बचत गटांच्या उत्पादनांसाठी मॉल उभारणार

Image
  जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बचत गटांच्या उत्पादनांसाठी मॉल उभारणार        _______   केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड. सातारा दि. 24 : बचत गटांसाठी त्यांच्या उत्पादनांचे मार्केटिंग होणे जास्त गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मॉल उभारणार असल्याची माहिती केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली.             जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये केंद्र पुरस्कृत विविध योजनांचा आढावा केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.             शासकीय योजना संवेदनशिलतेने राबवाव्यात असे सांगून केंद्रीय वित्त राज्यमंत्री श्री. कराड म्हणाले, बचत गटांना लागणारी सर्वती मदत करण्यासाठी शासन सज्ज आहे. घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना जमीन नस...

दौलतनगर परिसराचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करा. - पालकमंत्री शंभूराज देसाई.

Image
  दौलतनगर परिसराचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करा.  - पालकमंत्री शंभूराज देसाई.   सातारा दि. २० - दौलत नगर, मरळी ता. पाटण परिसर पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.        मरळी येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या बैठक सभागृहात आयोजित बैठकीवेळी  पालकमंत्री श्री. देसाई बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. रोकडे, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.         मरळी परिसराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, या निधीतून परिसरात दर्जेदार कामे करावीत. परिसरात एक चांगले बालोद्यान उभारावे. शिवसृष्टी, संगीत कारंजे, लेजर शो, मुलांची खेळणी यांची उभारणी करावी. लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकाचे दुसऱ्या टप्प्याचे क...

कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश. उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म)  घोगाव, या महाविद्यालयातील विद्यार्थिनीनी मॉडेल सादरीकरण स्पर्धेत यश संपादन केले. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस उचगाव कॅम्पसचे न्यू पॉलिटेक्निक अँड न्यू कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने डीजी फेस्ट नॅशनल लेवल टेक्निकल परिसंवाद 2023 मॉडेल सादरीकरण स्पर्धेत कु. पूर्वा संजय पवार व कु. सानिका धनाजी कदम यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. या विद्यार्थिनींना मार्गदर्शन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील व प्रा. प्रियांका आलेकरी यांनी केले. या यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव श्री प्रसुन जोहरी, प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची विविध ठिकाणी भेट.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची विविध ठिकाणी भेट. कराड -प्रतिनिधी.  श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच इतर गोष्टींचे ज्ञान अवगत व्हावे या उद्देशाने  महाविद्यालय प्रत्येक वर्षी बाहेर भेटी देत असते. त्या अनुषंगाने यावर्षीही उंडाळे ग्रामीण रुग्णालय उंडाळे येथे सोशल फार्मसी तसेच हॉस्पिटल विषयी अधिक ज्ञान मिळावे यासाठी भेट देण्यात आली. तसेच यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज, कराड येथे औषधीय वनस्पतींची बाग व फार्माकोगनशी या विषयाचे ज्ञान व्हावे व या विविध औषधीय वनस्पती पाहता याव्यात यासाठी भेट देण्यात आली. तर कोळे येथील अनाथआश्रम या ठिकाणी भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांना धान्य वाटप करण्यात आले व राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत तेथील विद्यार्थ्यांना आरोग्य आणि स्वच्छता याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.  या भेटीवेळी विद्यार्थ्यांच्या समवेत महाविद्यालयाच्या प्रा. प्रियांका आलेकरी व प्रा. पूजा भोसले या उपस्थित होत्या.

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त वाकन रोड कराड येथे मोफत आरोग्य तपासणी..

Image
 श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त वाकन रोड कराड येथे मोफत आरोग्य तपासणी. कराड प्रतिनिधी:-                      आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जि.नाशिक सद्गुरू परमपूज्य मोरे दादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट अंतर्गत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्ट त्र्यंबकेश्वर  व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दरबार), वाकाण रोड कराड यांच्या वतीने कृष्णा नाका रूक्मिणी नगर, जनकल्याण शाळेच्या अलिकडे, वत्रे वस्ती जवळ, वाकाण रोड कराड येथे मंगळवार दि.१८ रोजी सकाळी १० ते ७ या वेळेत भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर व नाडी परीक्षण तसेच सर्व रोगनिदान शिबिर आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले तरी सर्व कराड शहरातील व तालुक्यातील ग्रामस्थांनी व भाविकांनी  कार्यक्रमाचा लाभ घ्यावा . असे आवाहन वाकाण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.     श्री स्वामी समर्थ  प.पु.गुरुमाऊली व गुरूपुत्र आदरणीय चंद्रकांत दादा मोरे यांच्या आशिर्वादाने दि...

शेरे शाळेचे स्नेह संमेलन उत्साहात संपन्न.

Image
  शेरे शाळेचे स्नेह संमेलन उत्साहात  संपन्न.   कार्वे प्रतिनिधी :-   शेरे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत  वार्षिक स्नेहसंमेलन व विविध गुण दर्शन नुकतेच उत्साहात पार पडले.या कार्यक्रमाचे उद्घाटन कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाजीराव निकम यांनी केले.यावेळी शेरे गावच्या सरपंच शितल निकम,उपसरपंच समीर पाटील,व्यवस्थापण समिती अध्यक्षा विद्या निकम,शेरे गाव वि.का.स. सोसायटी चेअरमन संभाजी निकम,माजी सरपंच प्रदिप गावडे,माजी उपसरपंच मोहन निकम,माजी केंद्रप्रमुख दिनकर निकम,व्यवस्थापण समितीच्या माजी अध्यक्षा सुनंदा निकम यांची उपस्थिती होती.       विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम शाळेच्या वतीने घेण्यात आला होता.विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची जोरदार तयारी करून गावकऱ्यांची वाहवा मिळवली. विद्यार्थ्यांनी बहारदार कार्यक्रम सादर केला. नाविन्यपूर्ण गाण्यांची निवड, उत्कृष्ट नृत्य, हावभाव यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले. ग्रामस्थांनी गाण्यांना चांगला प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षकांना गावाने उत्तम साथ व मदत केली. हा कार्यक्रम यश...

हॉटेल महाराजा व लॉजिंगचा उद्घाटन समारंभ संपन्न.

Image
  हॉटेल महाराजा व लॉजिंगचा उद्घाटन समारंभ संपन्न. कराड -प्रतिनिधी.  कराड-चांदोली रोड लोहरवाडी, ता.कराड जि.सातारा येथे निसर्गाच्या सानीद्यात, हॉटेल महाराजा व लॉजिंग या नवीन वास्तूचा उद्घाटन समारंभ, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य, युवा नेते, मा.श्री.साम्राटजी महाडीक (बाबा) व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक संचालक, युवा नेते, मा.सत्यजितजी देशमुख (भाऊ) यांच्या शुभहस्ते करण्यात आला.युवा  नेते, भाजपा सातारा लोकसभा प्रभारी, कृष्णा सहकारी बँक अध्यक्ष, युवा नेते, मा.डॉ.अतुलजी भोसले (बाबा) यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.  यावेळी य.मो.कृष्णा साखर कारखाना संचालक, मा.दयानंद पाटील (भाऊ) कराड कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती, मा.सुनील पाटील (दादा), व्हा.चेअरमन वारणा मोरणा पतसंस्था, मा.शिवाजी जाधव, कराड माजी जिल्हा परिषद सदस्य, मा.आनंदराव पाटील (राजाभाऊ), मा.पै.नानासाहेब पाटील, पाटण माजी पंचायत सदस्य मा.नानासाहेब सावंत, य.मो.कृष्णा साखर कारखाना माजी संचालक, मा.पांडुरंग होनमाणे, कृष्णा बँक संचालक, मा.प्रमोद पाटील (आबा), मा.आण्णासाहेब जाधव, पंचायतराज व ग्रामविकास विभा...

सर्व शासकीय, निमशसकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मास्क वापरणे अनिवार्य .

Image
  सर्व शासकीय, निमशसकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मास्क वापरणे अनिवार्य - जिल्हाधिकारी  रुचेश जयवंशी यांचे आदेश नागरिकांना मास्क वापरण्याचेही आवाहन सातारा दि . 3 : राज्यात वाढत असलेल्या सिझनल इन्फ्लुएन्झा आजार आणि कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर आवश्यक पूर्वतयारी व उपायोजना राबवण्याविषयी सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आदेश दिले आहेत.             या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालये यामधील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.             तसेच गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी जसे आठवडी बाजार, एसटी स्टॅंड परिसर, यात्रा, मेळावे, लग्नसमारंभ, मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येण्याची ठिकाणे या सर्व ठिकाणी सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा. सामाजिक अंतर राखून वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करा...

नांदगावात ग्रामपंचायत सदस्याने पहिल्याच दिवशी भरले घरपट्टी, पाणीपट्टी कर.

Image
  नांदगावात ग्रामपंचायत सदस्याने   पहिल्याच दिवशी भरले घरपट्टी, पाणीपट्टी कर.   प्रशांत सुकरे यांनी सलग दुसऱ्या वर्षी जपले कर्तव्य. कराड - प्रतिनिधी. ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर हे प्रत्येक ग्रामपंचायतीचे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे हे कर वेळेत भरणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. याच कर्तव्य भावनेतून नांदगावचे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे यांनी नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी (१ एप्रिल २३ रोजी)आपले स्वतः चे नावावरील तसेच वडिल व बंधूंचे नावावरील सर्व कर ग्रामपंचायतीमध्ये भरून इतरांसमोर सलग दुसऱ्या वर्षी आदर्श ठेवला आहे.   ग्रामपंचायत कर्मचारी नितीन आंबेकर यांच्याकडे या रकमेचा धनादेश प्रशांत सुकरे यांनी सुपूर्द केला. यावेळी रघुनाथ मुळीक, विलास माटेकर, आनंदराव जाधव,सतीश तांबवेकर,मारुती फाळके आदी ग्रामस्थ उपस्थित होते. खरंतर कर वसुली हा विषय ग्रामपंचायतींसाठी डोकेदुखीचा  ठरताना दिसतो. अनेकदा या वसुलीसाठी प्रशासनाला कटु कारवाई करावी लागते. अशा वेळी प्रबोधन ही गोष्ट महत्वाची बनते.ते करणे गरजेचे आहे....

नांदगाव येथे आरोग्य शिबीर संपन्न.

Image
  नांदगाव येथे आरोग्य शिबीर संपन्न.   कराड  - प्रतिनिधी. नांदगाव ता. कराड येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे मंगळवारी कृष्णा हॉस्पिटल कराड व डॉ. अतुल भोसले युवक संघटना नांदगाव यांच्या वतीने आरोग्य शिबीर आयोजित केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.  शिबिरात पंचक्रोशीतील २५० वर रुग्णांची  मोफत तपासणी करण्यात आली.  डॉ. अतुल भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे मोफत सर्व रोग निदान शिबिर व दंतचिकित्सा  शिबीर आयोजित केले होते. सर्व रोग निदान शिबिरामध्ये कान नाक घसा, अस्थिरोग, त्वचारोग, स्त्रीरोग, डोळ्यांच्या तपासण्या करण्यात आल्या तर दंतचिकित्सा शिबिरामध्ये दाता संबंधित तपासण्या करण्यात आल्या. लोकांना याचा फायदा झाला.  सकाळी १० वाजता शिबिरासाठी आलेल्या डाँक्टरांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी दक्षिण मांड व्हँली शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वि.तु.सुकरे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती. याचवेळी संदीप एकनाथ पाटील यांच्या वतीने विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला माजी ग्रामपंचायत सदस्य वसंत माटेकर,तंटामुक्...

उंडाळे येथे इफ्तार पार्टीचे आयोजन.

Image
  उंडाळे येथे इफ्तार पार्टीचे आयोजन. कराड - प्रतिनिधी. उंडाळे ता. कराड येथील दैनिक पुढरीचे पत्रकार वैभव पाटील (आबा) यांचा  वाढदिवस व सध्या मुस्लिम  बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. त्यानिमित्त सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्वधर्मीय इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.  एकता आणि बंधुता उंडाळे परिसरात दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, राम नवमी, हनुमान जयंती व ईद-ए-मिलाद असे सण मोठ्या उत्साहात सर्वांच्या सहभागातून साजरे केले जातात. उंडाळे परिसरात एकता आणि बंधुता राखून सलोखा राखला जातो.संपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या थाटात केले जाते. आणि विशेष म्हणजे सर्व जण एकमेकांच्या कार्यक्रमात हिरिरीने सहभागी होतात. त्याच अनुषंगाने शुक्रवारी  सायंकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन करून सामाजिक एकोपा व एकतेचा संदेश देण्यात आला. यावेळी उंडाळे व परिसरातील हिंदू - मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.