नांदगावात ग्रामपंचायत सदस्याने पहिल्याच दिवशी भरले घरपट्टी, पाणीपट्टी कर.

 नांदगावात ग्रामपंचायत सदस्याने   पहिल्याच दिवशी भरले घरपट्टी, पाणीपट्टी कर.

 प्रशांत सुकरे यांनी सलग दुसऱ्या वर्षी जपले कर्तव्य.

कराड - प्रतिनिधी.

ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर हे प्रत्येक ग्रामपंचायतीचे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे हे कर वेळेत भरणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. याच कर्तव्य भावनेतून नांदगावचे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे यांनी नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी (१ एप्रिल २३ रोजी)आपले स्वतः चे नावावरील तसेच वडिल व बंधूंचे नावावरील सर्व कर ग्रामपंचायतीमध्ये भरून इतरांसमोर सलग दुसऱ्या वर्षी आदर्श ठेवला आहे.

  ग्रामपंचायत कर्मचारी नितीन आंबेकर यांच्याकडे या रकमेचा धनादेश प्रशांत सुकरे यांनी सुपूर्द केला. यावेळी रघुनाथ मुळीक, विलास माटेकर, आनंदराव जाधव,सतीश तांबवेकर,मारुती फाळके आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

खरंतर कर वसुली हा विषय ग्रामपंचायतींसाठी डोकेदुखीचा  ठरताना दिसतो. अनेकदा या वसुलीसाठी प्रशासनाला कटु कारवाई करावी लागते. अशा वेळी प्रबोधन ही गोष्ट महत्वाची बनते.ते करणे गरजेचे आहे. 



 मग इतरांना सांगावे ..

ग्रामस्थांनी कर वेळेत भरावेत असे नुसते आवाहन करुन उपयोग नाही. मात्र 'आधी केले नी मग सांगितले' ही उक्ती क्रतीत उतरवून प्रशांत सुकरे यांनी वेगळा संदेश दिला आहे.गतवर्षी ही त्यांनी नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी कर भरले होते. त्यात त्यांनी सातत्य ठेवले आहे.त्याबद्दल ग्रामस्थांच्यातून त्यांचे कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .