कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची विविध ठिकाणी भेट.
कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची विविध ठिकाणी भेट.
कराड -प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच इतर गोष्टींचे ज्ञान अवगत व्हावे या उद्देशाने महाविद्यालय प्रत्येक वर्षी बाहेर भेटी देत असते. त्या अनुषंगाने यावर्षीही उंडाळे ग्रामीण रुग्णालय उंडाळे येथे सोशल फार्मसी तसेच हॉस्पिटल विषयी अधिक ज्ञान मिळावे यासाठी भेट देण्यात आली. तसेच यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज, कराड येथे औषधीय वनस्पतींची बाग व फार्माकोगनशी या विषयाचे ज्ञान व्हावे व या विविध औषधीय वनस्पती पाहता याव्यात यासाठी भेट देण्यात आली. तर कोळे येथील अनाथआश्रम या ठिकाणी भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांना धान्य वाटप करण्यात आले व राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत तेथील विद्यार्थ्यांना आरोग्य आणि स्वच्छता याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या भेटीवेळी विद्यार्थ्यांच्या समवेत महाविद्यालयाच्या प्रा. प्रियांका आलेकरी व प्रा. पूजा भोसले या उपस्थित होत्या.

Comments
Post a Comment