श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त वाकन रोड कराड येथे मोफत आरोग्य तपासणी..
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त वाकन रोड कराड येथे मोफत आरोग्य तपासणी.
कराड प्रतिनिधी:-
आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जि.नाशिक
सद्गुरू परमपूज्य मोरे दादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट अंतर्गत
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने
मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्ट त्र्यंबकेश्वर व
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दरबार), वाकाण रोड कराड यांच्या वतीने कृष्णा नाका रूक्मिणी नगर, जनकल्याण
शाळेच्या अलिकडे, वत्रे वस्ती जवळ,
वाकाण रोड कराड येथे मंगळवार दि.१८ रोजी सकाळी १० ते ७ या वेळेत भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर व नाडी परीक्षण तसेच सर्व रोगनिदान शिबिर आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले तरी
सर्व कराड शहरातील व तालुक्यातील ग्रामस्थांनी व
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा . असे आवाहन वाकाण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री स्वामी समर्थ प.पु.गुरुमाऊली व गुरूपुत्र आदरणीय चंद्रकांत दादा मोरे यांच्या आशिर्वादाने दिंडोरी प्रणित
आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र वाकाण रोड कराड श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दि. १२ पासून श्री गुरुचरित्र पारायण व अखंड नाम, जप, यज्ञ सप्ताहास प्रारंभ झाला आहे.
श्री गुरुचरित्र पारायण व
अखंड, नाम, जप, यज्ञ सप्ताह सोहळ्याचे वाकाण कराड केंद्राचे १८ वे वर्ष असून मंगळवार १८ रोजी सकाळी ठिक १०:०० वाजता. श्री स्वामी समर्थ महाराजांचा भव्य पुण्यतिथी सोहळा व महानैवेदय आरती आणि
गुरूचरित्र पारायण सांगता व पूर्णाहुती हा कार्यक्रम पार पडणार आहे.
तसेच सर्व रोगनिदान शिबीरामध्ये
शुगर,बीपी,हिमोग्लोबिन(HB) व रक्त गट तपासणी केली जाईल.
तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाने ह्यदयविकार, मधुमेह (डायबेटीस) रक्तदाब, सर्व प्रकारचे कॅन्सर, सांध्याचे विकार,
त्वचा विकार,वात विकार,पोटांचे विकार, महिलांचे विकार, मुतखडा, मुळव्याध, कावीळ, लहान मुलांचेविकार, मनोविकार इ. विकार आदींची शिबीरामध्ये तपासणी केली जाणार आहे. तरी आरोग्य तपासणीला येताना आपले जुने रिपोर्ट बरोबर घेऊन येणे.
तसेच प्रत्येक कुटूंबासाठी / कुटुंबातील प्रत्येकासाठी
पुढील पैकी कोणताही प्रश्न / समस्या भेडसावत आहे काय ?
विनामुल्य मार्गदर्शन ,आपल्या मुला मुलींच्या विवाहास अडथळे येत आहेत काय ?, आपले मन अशात, अस्वस्थ व चिंताग्रस्त आहे का ?, कुटुंबातील सदैव अशांतता, कटकटी, भांडणे, हितशत्रुंचा त्रास आहे काय ?, मुले कुसंगतीत, व्यसनाधीन आहेत का , पती व्यसनी आहे का ?, संतती न होणे, झालेली संतती न टिकणे या सारख्या समस्या आहेत काय , घरात सदैव आजारपण आहे का ? औषधउपचार करूनसुध्दा मार्ग निघत नाही का ?, आपल्यावर कर्जाचा बोजा, आर्थिक बोजा, आर्थिक अडचणी, घरात पैसा न टिकणे
अनावश्यक गोष्टींवर पैसा खर्च होणे या सारख्या समस्या आहेत का ?, आपल्या मुलांच्या शिक्षणात प्रगती नाही. मुलांच्या नोकरीचे प्रश्न आहेत का ?, आपली व्यवसायाची / नोकरीची समस्या आहे का ?
, व्यवसाय / दुकान / उद्योग चांगला चालत नाही का ? त्यात अडचणी आहेत काय ?, आपल्या मागे कोर्ट कचेऱ्या यांच्या कटकटी आहेत का ?, आपल्या शेतामध्ये योग्य उत्पन्न निघत नाही का ?
शेतीच्या / भाऊबंदकीच्या कांही समस्या आहेत का ?, अनुभव हेच या मार्गाचे खरे वैशिष्ठ्य असून याबाबत मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी संपर्कासाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दरबार) वाकाण रोड कराड. मो. 8625098333 / 9146146555 संपर्क साधावा असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment