उंडाळे येथे इफ्तार पार्टीचे आयोजन.

 

उंडाळे येथे इफ्तार पार्टीचे आयोजन.


कराड - प्रतिनिधी.

उंडाळे ता. कराड येथील दैनिक पुढरीचे पत्रकार वैभव पाटील (आबा) यांचा  वाढदिवस व सध्या मुस्लिम  बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. त्यानिमित्त सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्वधर्मीय इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. 

एकता आणि बंधुता

उंडाळे परिसरात दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, राम नवमी, हनुमान जयंती व ईद-ए-मिलाद असे सण मोठ्या उत्साहात सर्वांच्या सहभागातून साजरे केले जातात. उंडाळे परिसरात एकता आणि बंधुता राखून सलोखा राखला जातो.संपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या थाटात केले जाते. आणि विशेष म्हणजे सर्व जण एकमेकांच्या कार्यक्रमात हिरिरीने सहभागी होतात. त्याच अनुषंगाने शुक्रवारी  सायंकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन करून सामाजिक एकोपा व एकतेचा संदेश देण्यात आला. यावेळी उंडाळे व परिसरातील हिंदू - मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .