शेरे शाळेचे स्नेह संमेलन उत्साहात संपन्न.
शेरे शाळेचे स्नेह संमेलन उत्साहात संपन्न.
कार्वे प्रतिनिधी :-
शेरे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन व विविध गुण दर्शन नुकतेच उत्साहात पार पडले.या कार्यक्रमाचे उद्घाटन कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाजीराव निकम यांनी केले.यावेळी शेरे गावच्या सरपंच शितल निकम,उपसरपंच समीर पाटील,व्यवस्थापण समिती अध्यक्षा विद्या निकम,शेरे गाव वि.का.स. सोसायटी चेअरमन संभाजी निकम,माजी सरपंच प्रदिप गावडे,माजी उपसरपंच मोहन निकम,माजी केंद्रप्रमुख दिनकर निकम,व्यवस्थापण समितीच्या माजी अध्यक्षा सुनंदा निकम यांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम शाळेच्या वतीने घेण्यात आला होता.विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची जोरदार तयारी करून गावकऱ्यांची वाहवा मिळवली. विद्यार्थ्यांनी बहारदार कार्यक्रम सादर केला. नाविन्यपूर्ण गाण्यांची निवड, उत्कृष्ट नृत्य, हावभाव यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले. ग्रामस्थांनी गाण्यांना चांगला प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षकांना गावाने उत्तम साथ व मदत केली. हा कार्यक्रम यशस्वीरित्या, नियोजनबद्ध ,शिस्तबद्ध, यशस्वीपणे व अलोट गर्दीत पार पडला. यावेळी रेठरे बु. केंद्रातील शिक्षक मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमास शेरे परिसरातील पालक व ग्रामस्थांनी तुफान गर्दी केली होती.विशेषतः महिला वर्गाची उपस्थिती वाखाणण्याजोगी होती.
या कार्यक्रमासाठी कराडचे गटशिक्षणाधिकारी संमती देशमाने ,शालेय पोषण आहार अधीक्षक विजय परीट ,शिक्षण विस्तार अधिकारी रमेश कांबळे, केंद्रप्रमुख निवास पवार यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.शेरे शाळेचे शिक्षक प्रदिप कुंभार,प्रकाश फल्ले,योगिता कदम,स्नेहल कांबळे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. यशस्वीपणे पार पडलेल्या व उदंड प्रतिसाद मिळालेल्या या कार्यक्रमाचे शेरे परिसरातून कौतुक होत आहे.

Comments
Post a Comment