नांदगाव येथे आरोग्य शिबीर संपन्न.
नांदगाव येथे आरोग्य शिबीर संपन्न.
कराड - प्रतिनिधी.
नांदगाव ता. कराड येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे मंगळवारी कृष्णा हॉस्पिटल कराड व डॉ. अतुल भोसले युवक संघटना नांदगाव यांच्या वतीने आरोग्य शिबीर आयोजित केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. शिबिरात पंचक्रोशीतील २५० वर रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.
डॉ. अतुल भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे मोफत सर्व रोग निदान शिबिर व दंतचिकित्सा शिबीर आयोजित केले होते. सर्व रोग निदान शिबिरामध्ये कान नाक घसा, अस्थिरोग, त्वचारोग, स्त्रीरोग, डोळ्यांच्या तपासण्या करण्यात आल्या तर दंतचिकित्सा शिबिरामध्ये दाता संबंधित तपासण्या करण्यात आल्या. लोकांना याचा फायदा झाला.
सकाळी १० वाजता शिबिरासाठी आलेल्या डाँक्टरांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी दक्षिण मांड व्हँली शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वि.तु.सुकरे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती. याचवेळी संदीप एकनाथ पाटील यांच्या वतीने विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला माजी ग्रामपंचायत सदस्य वसंत माटेकर,तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष जयवंत मोहिते, कालवडे बेलवडे उपसा जलसिंचन योजनेचे संचालक संभाजी पाटील,धोंडीराम शिंदे, हितेश सुर्वे,राम शिंदे, जगन्नाथ पाटील, संभाजी पाचंगे, सुहास माटेकर ,पंकज शिंदे, दीपक मुळीक, शिवाजी माटेकर, रणधीर शिंदे, अरुण पाटील, सचिन जठार, संजय तलबार, उदय चौधरी, पोपट आवळे, गणपती पवार, संदीप पाटील, संतोष पाटील, रघुनाथ जाधव, अक्षय पाटील, पंकज शिंदे, प्रणित कुचेकर, शरद शिणगारे आदींची उपस्थिती होती.
ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे यांनी प्रास्ताविक केले. हणमंतराव यादव यांनी सूत्रसंचालन केले. संभाजी पाचंगे यांनी आभार मानले.

Comments
Post a Comment