कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश.

 कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश.

उंडाळे - प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) 

घोगाव, या महाविद्यालयातील विद्यार्थिनीनी मॉडेल सादरीकरण स्पर्धेत यश संपादन केले.

श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस उचगाव कॅम्पसचे न्यू पॉलिटेक्निक अँड न्यू कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने डीजी फेस्ट नॅशनल लेवल टेक्निकल परिसंवाद 2023 मॉडेल सादरीकरण स्पर्धेत कु. पूर्वा संजय पवार व कु. सानिका धनाजी कदम यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.

या विद्यार्थिनींना मार्गदर्शन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील व प्रा. प्रियांका आलेकरी यांनी केले.

या यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव श्री प्रसुन जोहरी, प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .