Posts

GONDWANA BREAKING NEWS.

Image
                                   ब्यूरो  रीपोर्ट - शकूर मुल्ला.                   दिनांक ३१ डिसेंबर, २०२१, शुक्रवार. ● कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारच्या आपत्ती विभागाने परिपत्रक जारी करत राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत ●  नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाचे शिर्डीपर्यंतचे काम येत्या फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या टप्प्यातील केवळ ४५ किलोमीटरचे काम बाकी राहिले आहे ● राज्यात एसटी महामंडळाने आतापर्यंत एकूण १० हजार ७६४ एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन केले असून, ७१९ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे ● सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी कोकण किनारे गजबजले, ठिकठिकाणी पर्यटकांची गर्दी ● पुण्यातील येरवडा परिसरात एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जमावाकडून हल्ला; दोन पोलीस जखमी ● वैद्यकीय अभ्यासक्रमांसह विविध अभ्यासक्रमांच्या नव्या महाविद्यालयांच्या मूळ शुल्कात यंदा गेल्यावर्षीच्या त...

GONDWANA NEWS BREAKING .

Image
                                                  ब्यूरो  रीपोर्ट -  शकूर मुल्ला.                        दिनांक २९ डिसेंबर, २०२१, बुधवार. ● कंत्राटदार बदलले, गोवा महामार्गाचे काम लवकर पूर्ण करणार, एकनाथ शिंदेचे विधानसभेत आश्वासन ● विमान कंपन्यांनी प्राधिकरणाचे २,३६२ कोटी रुपये थकविले ● ड्रग्ज तस्करीत उच्चभ्रू घरातील गृहिणी; वर्षभरात २३० जणांवर कारवाई ● कुपवाडमध्ये प्रेमी युगुलांची गळफास घेवून आत्महत्या, सावर्डे पाठोपाठ कुपवाड हादरले  ● थरार! चालकाने ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबला अन् कार दोघांच्या अंगावरुन गेली  ● विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसासह गारपीट; नागपूरसह, अकोला, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद व जालना जिल्ह्यात गारपीट झाल्याने शेतीवर पुन्हा नवे संकट ● राज्याचे पोलीस दल अधिक बळकट करण्यासाठी ५० हजार पदांची भरती केली जाणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेत घोषणा  ● मुंबई...

गेट-टू गेदर दिलासा,विसावा,की नवी हुरहूर.

Image
 गेट-टू गेदर दिलासा,विसावा,की नवी हुरहूर.                  ।।।। बॅच 1995/96।।।। शा   ळा या दोन अक्षरी शब्दात संपूर्ण  विश्व सामावले आहे याची जाणीव आपल्याला शाळा सोडून काही वर्षे झाल्यानंतर समजले. तसे बऱ्यापैकी 25 वर्षाचा  मोठा कालावधी लोटून  गेला......असो         आपली शाळा स्व: दादासाहेब उंडाळकर माध्यमिक, उच्चमाध्यामिक विद्यालय उंडाळे सांगायचे तात्पर्य म्हणजे  10वीच्या व्हाट्सउप ग्रुपवर  गेट- टू गेदरची  पोस्ट पाहिली आणि मन भारावून गेले या निमित्ताने आठवणींच्या शाळेत जाण्याचे ठरवले व मन अगदी जुन्या आठवणीत रमून गेले. मनात अनेक जुन्या आठवणींची गर्दी झाली. ती अशी की शाळेची पहिली घंटा वाजल्यानंतर विद्यार्थ्यांची होते अगदी तसे।              क्लास सुरू असताना एकमेकाकडे चोरून पाहणे,कागद, खडू फेकून मारणे, दुपारची बेल झाली की मधल्या सुट्टीतील एकत्रीत बसून मित्र मैत्रिणींचा वाटून खाल्लेला डबा, आजच्या फाईव्ह स्टार हॉटेलच्या जेवणाला त्याची चव येऊ शकत नाही....

पर्यावरण संवर्धन हे समाजासाठी अत्यत महत्वाचे .

Image
  पर्यावरण संवर्धन हे समाजासाठी अत्यत महत्वाचे.   ______महेंद्र लाड . कार्वे प्रतिनिधी:-  पर्यावरण संवर्धन हे समाजासाठी अत्यत महत्वाचे असल्याची जाणीव ठेवून महाराष्ट्र भुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान चे कार्य सुरु असुन हे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड यांनी व्यक्त केले. तुपारी ता. पलूस ग्रामपंचायती मध्ये महाराष्ट्र भुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण करणेत आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पलूस पंचायत समिती चे उपसभापती सुरेश खारगे, सरपंच सुरेखा राक्षे, उपसरपंच सुनील पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती. महेंद्र लाड पुढे म्हणाले की, धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या वतीने जी शिकवण दिली जाते त्यातून बंधुभाव निर्माण होऊन मानवता धर्माची जपणूक होते. तसेच पर्यावरण रक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या वृक्षलागवड वसंवर्धनअभियानाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या समाज उपयोगी कार्याची माहिती...

GONDWANA BREAKING NEWS.

Image
                                   ब्यूरो  रीपोर्ट - शकूर  मुल्ला.                 दिनांक २४ डिसेंबर, २०२१, शुक्रवार.                                राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस. ● ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. त्यानुसार आज, शुक्रवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात येणार असून, याबाबत आज नियमावली जाहीर करण्यात येईल ● आरटीई अंतर्गत घेण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक शालेय शिक्षणंत्री वर्षा गायवाड यांनी जाहीर केले आहे. २८ डिसेंबरपासून या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाला सुरूवात होणार असल्यची माहिती शालेय शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली  ● चर्चमध्ये उपलब्ध आसनक्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच परवानगी; राज्य सरकरने जारी केल्या नाताळ साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना ● पेपर फुटी प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी न्यायालया...

प्रदिप कुंभार यांना हॅपी टू हेल्प फाउंडेशन चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.

Image
  प्रदिप कुंभार यांना हॅपी टू हेल्प फाउंडेशन चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान. कार्वे प्रतिनिधी : प्रविण पाटील प्रदिप कुंभार यांना हॅपी टू हेल्प फाउंडेशन औरंगाबाद च्या वतीने औरंगाबाद चे खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.औरंगाबाद येथील भारतरत्न मौलाना आझाद संशोधन केंद्र येथे हा भव्य कार्यक्रम नुकताच पार पडला.या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.              औरंगाबाद येथील हॅपी टू हेल्प फाउंडेशन च्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक  व जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक  ,तसेच निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.त्यासाठी प्रस्ताव व निबंध मागवण्यात आले होते.त्यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातून शिक्षकांनी भाग घेतला होता. कमिटी तर्फ शिक्षकांची निवड करून   ४ राज्यस्तरीय ,१० जिल्हास्तरीय व निबंध स्पर्धेतील ७ असे एकूण २१ सत्कार मूर्तींचा  सत्कार फौंडेशन ने मान्यवरांच्या हस्ते केला.प्रदिप कुंभार यांची  मराठी माध्यम ज...

बहुजन पत्रकार संघाच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी दिलीप महाजन यांची निवड.

Image
  बहुजन पत्रकार संघाच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी दिलीप महाजन यांची निवड . कराड - प्रतिनिधी   पत्रकारांच्या अडीअडचणी आणि अन्यायाविरोधात झगडणाऱ्या निर्भीड अखिल महाराष्ट्र बहुजन पत्रकार न्याय हक्क संघर्ष समितीच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी मानवाधिकार न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी, तडसर येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप महाजन यांची निवड करण्यात आली.  महाजन यांची निवड  पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांच्या आदेशाने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संपतराव मोहिते यांनी ही निवड घोषित केली.  निवडीचे पत्र नुकतेच कराड येथील पत्रकार संघटनेच्या बैठकीत दिलीप महाजन यांना देण्यात आले आहे. महाजन यांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी,ॲडव्हान्स खबर चे संपादक अंश खलीपे, उंब्रज येथील पत्रकार रवींद्र वाकडे,  तिरंगा रक्षक शिराळा तालुका प्रतिनिधी बाबासाहेब कांबळे, सांगली जिल्हा परिषद सदस्या एडवोकेट  शांता कनूंजे, ओगलेवाडी येथील जेष्ठ पत्रकार दत्ता जंगम,  कडेगाव येथील एडवोकेट कुलदीप महाजन,  माजी पंचायत समिती सदस्य दीपक ल...