GONDWANA BREAKING NEWS.

          


                        ब्यूरो  रीपोर्ट - शकूर  मुल्ला.


                दिनांक २४ डिसेंबर, २०२१, शुक्रवार.

           

                   राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस.


● ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. त्यानुसार आज, शुक्रवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात येणार असून, याबाबत आज नियमावली जाहीर करण्यात येईल


● आरटीई अंतर्गत घेण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक शालेय शिक्षणंत्री वर्षा गायवाड यांनी जाहीर केले आहे. २८ डिसेंबरपासून या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाला सुरूवात होणार असल्यची माहिती शालेय शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली 


● चर्चमध्ये उपलब्ध आसनक्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच परवानगी; राज्य सरकरने जारी केल्या नाताळ साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना


● पेपर फुटी प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी न्यायालयात जाणार; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा इशारा


● विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांनी लसीकरणाचा वेग वाढवावा; केंद्राच्या सूचना


● कोविड-१९ प्रोटोकॉलचा अवमान केल्याप्रकरणी प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या ३५-४० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल


● ओमायक्रॉनचा संसर्ग वाढल्यामुळे आरोग्य यंत्रणेची कसून तपासणी केली पाहिजे, पंतप्रधान नरेंद्र मोदींंची प्रतिक्रिया


● राज्यात गुरुवारी २३ ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली. यातील १३ जण पुणे जिल्ह्यातील आहेत. यात पिंपरी-चिंचवडमधील ७, पुणे शहरातील ३ आणि पुणे ग्रामीणमधील ३ रुग्णांचा समावेश आहे


● उत्तर प्रदेशात रॅलींवर बंदी घाला, निवडणूक पुढे ढकलण्यावरही सरकारनं विचार करावा, अलाहाबाद हायकोर्टाची पंतप्रधान मोदींना सूचना 

 

● १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास विलंब शुल्क माफी, परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत अर्ज करण्याची मुभा: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची विधानपरिषदेत घोषणा


● ओमायक्रॉनग्रस्तांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता देशभरात नाईट लॉकडाऊन बाबत विचार सुरु; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती, अधिवेशनात आमदार मास्क वापरत नसल्यावरुनही अजितदादा भडकले


● राज्यातील महिलांना मिळणार आता सुरक्षाकवच! विधानसभेत 'शक्ती कायदा' एकमतानं मंजूर; महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर जलद करवाई करता येणार 


● नव्या प्रभाग संख्येनुसार निवडणुकीची प्रक्रिया सुरू, अडथळा आल्यास प्रक्रिया विस्कळीत होईल; निवडणूक आयोगाचं हायकोर्टात प्रतिपादन


● BMC रुग्णालयात चार बालकांच्या मृत्यू, विधानसभेत गदारोळ; या प्रकरणाशी संबंधित अधिकारी निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा


● अधिवेशन सुरू असताना विधानभवनाबाहेर एका व्यक्तीकडून आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांना प्रसंगावधान राखत या व्यक्तीला ताब्यात घेतले, मात्र आत्मदहनाचा प्रयत्न का केला हे, अद्याप समोर आलेले नाही


● आरोग्यविभाग टीईटी पाठोपाठ आता पोलीस भरतीतील गैरप्रकार उघडकीस; मुंबईत सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत उमेदवाराचे गुण वाढविल्याचा प्रकार; दोन महिला पोलीसांना तत्काळ निलंबित करण्यात आले असून विभागीय चौकशी सुरू 


● करुणा मुंडेंनी केली शिवशक्ती सेना पक्षाची घोषणा; ३० जानेवारीला होणार शिवशक्ती सेनेची स्थापना; अहमदनगरमध्ये मोठा मेळावा घेऊन पक्षाचे चिन्ह, पक्षाचा झेंडा आणि निवडणूक लढवण्यासंदर्भात माहिती जाहीर करणार


● नाशिक जिल्हा प्रशासनानं लसीकरणासाठी सक्तीचे उपाय योजण्यास सुरुवात केली; लस न घेतलेल्या लोकप्रतिनिधींना सरकारी कार्यालयात 'नो एन्ट्री', दुकानं, हॉटेल्समध्ये ग्राहकांना प्रवेश देण्यापूर्वी लसीकरणांच प्रमाणपत्र बंधनकारक.


● प्रो कब्बडी गुजरात जायंट्स ठरले जयपूर पिंक पँथर्सला भारी ; सात गुणांनी केला पराभव.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .