बैलगाडा शर्यतीचा धुरळा पुन्हा उडणार. सर्वोच्च न्यायालयाने दिली सशर्त परवानगी.
बैलगाडा शर्यतीचा धुरळा पुन्हा उडणार.
'सर्वोच्च न्यायालयाने दिली सशर्त परवानगी.'
ब्यूरो रिपोर्ट - गोंडवाना न्यूज.
बैलगाडा शर्यतीला अखेर परवानगी मिळाली बैलगाडा शैकिनांच्या संघर्षाचा व एकीचा मोठा विजय झाला.सुप्रिम कोर्टाने बैलगाडा चालक,मालक, व शौकीन यांना बैलगाडा शर्यतीस सशर्त परवानगी दिली.
महाराष्टात गेल्या 4 ते 5 वर्षांपासून बैलगाडा शर्यतीस बंदी घालण्यात आली होती.बैलगाडा शर्यतीस परवानगी मिळावी यासाठी बैलगाडा मालक,चालक,व शौकीन यांचा मोठया प्रमाणात संघर्ष सुरू होता. कित्येकदा निर्बंध डावलून देखील बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात होते.त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाले आहेत.
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारने सर्वच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन सर्वच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीस सशर्त परवानगी दिली.
Comments
Post a Comment