आमदार मानसिंगराव नाईक यांनी मंजूर केलेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ.

 आमदार मानसिंगराव नाईक यांनी मंजूर केलेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ.

शिराळा प्रतिनिधी - नानासाहेब कांबळे.

मांगले, भाटशीरगाव व देववाडी (ता. शिराळा) येथे विविध 72 लाखांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ झाला. मांगले येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत दुरूस्त करणे या 32 लाख रुपये कामाचा शुभारंभ सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक व जिल्हा परिषद सदस्य अश्विनीताई नाईक यांच्या शुभहस्ते झाला. या वेळी तालुक्याच्या सभापती मनिषाताई गुरव, बाजार समितीच्या उपसभापती नंदाताई पाटील, सुरेश पाटील, जयवंत पाटील, दत्तात्रय पाटील, डॉ. सतिष पाटील, सरपंच मिनाताई बेंद्रे, माजी सरपंच राहूल पवार, उदय पाटील व राजू दशवंत, उपसरपंच धनाजी नरूटे, सदाशीव शिंदे, माजी उपसरपंच आबासो गावडे, अशोक शेवडे व संदीप तडाखे, पंडीत निकम, अक्षय व अमर पाटील, रणजीत चरापले, डॉ. घड्याळे उपस्थित होते. भाटशिरगाव येथे लिंबार पाणंद रस्त्यावर दोन साकव बाधंणे या आमदार मानसिंगराव नाईक यांनी मंजूर केलेल्या 30 लाख रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा ध्यक्ष नाईक यांच्या हस्ते झाला. यावेळी सरपंच वैशाली आलुगडे, उपसरपंच शिवाजी पाटील, पुष्पा आलुगडे, संपत देशमुख, सहदेव पाटील, गणेश व मधुकर आलुगडे, समाधान व संपत देसाई आदी उपस्थित होते. देववाडी येथे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून 10 लाख रुपये खर्चाच्या लमाण तांडा समाज मंदिर कामाचे भूमीपूजन युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी सरपंच सचिन नांगरे, आनंदराव चव्हाण, विश्वास शेंडगे, प्रभाकर व विलास खोत, ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत, रघुनाथ खोत उपस्थित होते. यावेळी कार्यकर्ते व ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .