GONDWANA NEWS BREAKING .
ब्यूरो रीपोर्ट - शकुर मुल्ला.
● मुंबई पालिकेच्या 117 अधिकाऱ्यांना कोरोना पावला? निलंबित अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर घेतलं
● ओबीसी आरक्षण कायमचे संपविण्याचा राज्य सरकारचा कट, भाजपचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांचा आरोप
● १० वी आणि ११ वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली घोषणा
● मी राज ठाकरेंसोबत कायम राहणार, पक्षांतराच्या केवळ अफवा, मनसे नेते बाळा नांदगावकर यांचे स्पष्टीकरण
● साखर कारखान्यांसाठी चांगली बातमी, मिश्रित इथेलॉनवरील जीएसटीत १३ टक्क्यांनी कपात, केंद्र सरकारचा निर्णय
● राष्ट्रीय बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात सात लाख कर्मचारी संपात सहभागी, बँकेची सर्व कामे ठप्प, ग्राहकांचे हाल
● लससंशोधन केंद्र उभारण्यासाठी ‘सीरम’तर्फे ऑक्सफर्डला ५०० कोटी, नवे लससंशोधन केंद्र उभारण्याची ऑक्सफर्ड विद्यापीठाची घोषणा
● गर्भवती पत्नीसह पतीची आत्महत्या, बीड येथील धक्कादायक घटना, स्थानिक पोलिसांकडून तपास सुरू
● काँग्रेस नेते हार्दिक पटेल पुण्यात दाखल, उद्या कर्जत नगरपंचायतीच्या प्रचाराला लावणार हजेरी, काँग्रेस युवक कार्यकर्त्यांनी विमानतळावर केलं स्वागत
● लग्नासाठी मुलीचे वय १८ वर्षांवरून २१ वर्षे होणार? केंद्र सरकार महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत
● एसटीच्या 'स्मार्ट कार्ड' योजनेला मार्च-२०२२ पर्यंत मुदतवाढ; परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती
● नाशिकमध्ये २३ तारखेपासून नवीन नियम लागू; ओमायक्रॉनचा धोका पाहता पालकमंत्री छगन भुजबळांचा निर्णय
● 'विरोधकांकडे सध्या आरोप करण्याशिवाय काहीच राहिलेलं नाही' राज्यपालांविषयीच्या मुद्द्यावरून अजित पवारांचा भाजपला टोला
● वसईत परफ्यूम तयार करण्याच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना; आगीत मोठ्या प्रमाणात माल जवळून खाक
● चिंता वाढली! देशात ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव; महाराष्ट्रात सर्वाधिक ३२ रुग्ण
● आरोग्य विभाग आणि म्हाडाच्या परीक्षेनंतर आता टीईटी परीक्षेतही गैरव्यवहार झाल्याचं पुणे सायबर पोलीसांच्या तपासात उघड
● सरकार हातावर हात ठेवून गप्प बसणार नाही', आम्ही जनतेलाही बांधील; अनिल परब यांचा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना इशारा
● येत्या ४ दिवसांत वायव्य भारतात तीव्र थंडीची लाट; महाराष्ट्रातील तापमानातही होणार मोठी घट
● कॉन्टॅक्ट ट्रेसिंगनुसार करण जोहरच्या पार्टीत ८ जण होते. त्यांच्या जवळच्या संपर्कातील सर्वांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत; BMC प्रशासनाची माहिती
● जगातील सर्वाधिक १० प्रदूषित शहरांमध्ये भारतातील ९ शहरांचा समावेश; भारताला १६०० ते ४ हजार हवा गुणवत्ता मॉनिटर्सची (हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्र) गरज
Comments
Post a Comment