अखिल भारतीय ग्रामीण संघ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र येवती यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनो लसीकरण शिबीर संपन्न झाले.
अखिल भारतीय ग्रामीण संघ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र येवती यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनो लसीकरण शिबीर संपन्न झाले.
कराड - प्रतिनिधी. ( ज्ञानेश्वर शेवाळे.)
ओंड ता कराड येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र येवती यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनो लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ नरेंद्र माळी डॉ सुभाष जाधव पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे. महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले जिल्हा संघटक संजय पाटील जिल्हा कार्याध्यक्ष अमोल साठे कराड दक्षिण वृत्तपत्र संघटक प्रताप भणगे सामाजिक मंच सदस्य विवेक वसव उपसरपंच थोरात आरोग्य सहाय्यक सानप आदी उपस्थित होते यावेळी बोलताना सानप म्हणाले की अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र येवती यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनो लसीकरण शिबीर घेण्यात आले हा उपक्रम कौतुकास्पद आहे पत्रकार संघाच्या माध्यमातून विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात तर आमच्या आरोग्य केंद्राच्या वतीने कोरोना लसीकरण मोहिम जोमाने सुरू असुन ज्यांचे लसीकरण राहिले आहे त्यांनी आमच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी.या वेळी कोरोनो काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांना अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने कोरोना योद्धा हा सन्मान देवुन गौरविण्यात आले.
Comments
Post a Comment