कोकरूड येथे शिराळा तालुक्यातील सर्व आंबेडकरवादी बौद्ध संघटनांची बैठक संपन्न झाली.

 कोकरूड येथे शिराळा तालुक्यातील सर्व आंबेडकरवादी बौद्ध संघटनांची बैठक संपन्न झाली.



शिराळा प्रतिनिधी - नानासाहेब कांबळे.

  शिराळा तालुक्यातील बौद्ध बांधवांची बैठक  दि. 21 डिसेंबर 2021 रोजी कोकरूड येथे संपन्न झाली. या बैठकीस शिराळा तालुक्यातील विविध आंबेडकरवादी बौद्ध संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिराळा तालुक्यातील बौद्ध धम्म चळवळीची वाटचाल आणि वर्तमानात धम्मचळवळ कशी गतिमान करता येईल, या संदर्भात चर्चा झाली.

    या बैठकीमध्ये धम्म चळवळ गतिमान करण्या संदर्भात शिराळा तालूक्यातील सर्व प्रमुख संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आपले विचार मांडले आणि चर्चा करून जानेवारी महिन्यामध्ये 12 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी शिराळा तालुक्यामध्ये विराट बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्या संदर्भात चर्चा झाली.

    ही बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्याच्या नियोजना संदर्भात रविवार, दि. 26 डिसेंबर रोजी बुद्ध विहार रिळे या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीमध्ये धम्म परिषदेच्या संयोजनाची संयोजन समिती गठित करण्यात येणार आहे.

    तरी शिराळा तालुक्यातील सर्व बौद्ध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त, प्रत्येक गावातील मंडळांचे प्रमुख आणि कार्यकर्ते, धम्म उपासक-उपासिका यांनी या बैठकीला उपस्थित रहावे. असे आवाहन यावेळी करण्यात आले.

  या बैठकीस तालुक्यातील विविध संघटनांचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .