कोडोलीत दत्त जयंती उत्साहात संपन्न.

 कोडोलीत दत्त जयंती उत्साहात संपन्न.

कार्वे प्रतिनिधी :- 

कोडोली ता. कराड येथे दत्त जयंती उत्‍साहात संपन्‍न झाली. दत्त मंदिर हे कोडोली गावामध्ये कृष्णा नदीच्या तीरावरती निसर्गमय ठिकाणी आहे .दत्त जयंतीचे औचित्य साधून दत्तमंदिराच्या नवीन सभामंडप लोकवर्गणीतून बांधण्यात आला आहे. यावेळी संपूर्ण दत्त मंदिर रंगरंगोटी करून दत्त मंदिरामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्याचबरोबर आकर्षक रांगोळी काढली गेली. तसेच रंगीबेरंगी फुलांच्या मातीच्या कुंड्या मंदिर परिसरात ठेवण्यात आल्या होत्या. सकाळी दत्तांच्या पालखीचे संपूर्ण गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी सहा वाजता श्री दत्त जन्मोत्सवाच्या पाळण्याचा कार्यक्रम दत्त मंदिरात संपन्न झाला. दत्त नामाच्या जयघोषाने कोडोली नगरी दुमदुमली होती. तसेच संध्याकाळी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसादा मध्ये गोड खिरीचा आस्वाद कोडोलीतील सर्व दत्त भक्तांनी घेतला. त्याचबरोबर सकाळपासून दत्त मंदिरामध्ये दर्शनासाठी दत्तभक्त येत होते. संध्याकाळी एकतारी भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.



 


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .