GONDWANA NEWS BREAKING
ब्यूरो रीपोर्ट - शकूर मुल्ला.
दिनांक २२ डिसेंबर, २०२१, बुधवार.
● राज्यात 8 कोटी नागरिकांचा पहिला डोस पूर्ण, येत्या १५ ते २० दिवसांत महाराष्ट्रात १०० टक्के लसीकरण पूर्ण होईल; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहीती
● राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ५० हजारांचा दंड, देशमुखांचे वकिल गैरहजर राहिल्याप्रकरणी चांदीवाल आयोगाची कारवाई
● आजपासून विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार सुरु, विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत
● राज्यात रोकशाही आणि रोखशाही, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
● तपासास राज्य पोलीस समर्थ, परीक्षा घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीची विरोधकांची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळली
● अॅसीड हल्ला किंवा सामूहिक अत्याचार करून हत्या करणाऱ्यांना मृत्युदंड देण्याची तरतूद असणारा 'शक्ती कायदा' आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात संमत करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
● अहमदनगरच्या भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक ज्योती दत्तात्रय डफळ-नराळ यांना १० हजार रुपयांच्या लाच प्रकरणी ४ वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंड व दंड न दिल्यास तीन महिने कैद
● अहमदनगर जिल्ह्यात महिनाभरात ५ हजार ४६२ कोरोनाबाधित आढळले; १६२ मृत्यू; कोरोनाचे संकट अजूनही कायम
● केंद्राची राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे; ज्या जिल्ह्यात आठवड्यात रुग्णवाढ दर १० टक्क्यांपेक्षा अधिक असेल किंवा ४० टक्के खाटा रुग्णांनी व्यापल्यास, त्या जिल्ह्यात निर्बंधांसह कठोर नियमावली जारी करण्याच्या सूचना
● मुलींच्या विवाह वयाचे विधेयक स्थायी समितीकडे; लोकसभेत विरोधकांच्या आक्षेपानंतर निर्णय; गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने या दुरुस्ती विधेयकाला मान्यता दिली होती
● राष्ट्रविरोधी माहिती आणि खोट्या बातम्या प्रसारित केल्याचा ठपका ठेवत केंद्रीय माहिती प्रसारण विभागाने २० यूट्यूब वाहिन्या आणि दोन संकेतस्थळांवर बंदी घालण्याचे दिले आदेश
● गतविजेत्या आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारताने मंगळवारी आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य लढतीत जपानकडून ३-५ असा धक्कादायक पराभव पत्करला
▪️ दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक जाहीर; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
▪️ राज्यातील ३२ जिल्ह्यातील स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान एक- दोन अपवाद वगळता शांततेत पार पडलं
▪️ पेपर फुटीनंतर म्हाडाच्या परीक्षेची नवी तारीख जाहीर! आता १ फेब्रुवारी २०२२ ते १५ फेब्रुवारी २०२२ दरम्यान होणार परीक्षा
▪️ टीईटी पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष सुखदेव डेरे यांना अटक, पुणे पोलिसांची कारवाई
▪️ आरोग्य भरतीच्या पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलीसांनी बीड जिल्ह्य़ातील भारतीय जनता युवा मोर्चाचा उपाध्यक्ष संजय सानपला अटक
▪️ औरंगाबाद शहर पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांना दिलासा! १२ तासांऐवजी ८ तासांची ड्युटी देण्याचा निर्णय, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांची माहिती
▪️ जालन्यात नगरपंचायत निवडणुकीला हिंसाचाराचं गालबोट! बदनापूरमध्ये मतदानादरम्यान महाविकास आघाडीचे समर्थक-भाजपा समर्थकांत तुफान हाणामारी
▪️ बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी मतदान कार्ड आधार कार्डला लिंक करण्यासंबंधीचे निवडणूक सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर
Comments
Post a Comment