आमदार मानसिंगराव नाईक व संचालक सत्यजीत देशमुख यांचा सत्कार समारंभ संपन्न .
आमदार मानसिंगराव नाईक व संचालक सत्यजीत देशमुख यांचा सत्कार समारंभ संपन्न .
कासेगाव प्रतिनिधी - उमेश कांबळे.
भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील लोकनेते स्व. फत्तेसिंगराव नाईक लायन्स सेवा केंद्रात आज सांगली जिल्हा मध्यवती सहकरी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार मानसिंगराव नाईक व संचालक सत्यजीत देशमुख यांचा शिराळा तालुक्यातील बँकेच्या सर्व शाखांमार्फत सत्कार संपन्न झाला. यावेळी सत्कारार्थ आमदार मानसिंगभाऊ व संचालक देशमुख यांचे भाषण झाले. यावेळी तालुक्याच्या मनिषाताई गुरव, उपसभापती बी. के. नायकवडी, शिराळाच्या नगराध्यक्ष प्रतिभा पवार, शिराळा शेतकरी सूतगिरणी अध्यक्ष सुरेश चव्हाण, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जयवंत कडू-पाटील, सहकारी संस्थाचे सहाय्यक निबंधक डी. एस. खताळ, शिराळा पोलीस ठाण्याचे ए. पी. आय. गजेंद्र लोहार, पी. एस. आय. अविनाश वाडेकर, बी. एम. रामदुर्ग, जे. जे. पाटील, एस. एम. काटे, पी. वाय. सूर्यवंशी, आबा माने, अशोक माने, बी.ए. कोळी यांच्यासह जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिराळा तालुक्यातील बँकेच्या सर्व शाखांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment